पदभरतीत अडकले कर्मचारी-अधिकारी
By Admin | Updated: July 8, 2014 23:32 IST2014-07-08T23:32:20+5:302014-07-08T23:32:20+5:30
स्वत:ला पारदर्श असल्याचा कांगावा करणारेजिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी अखेर भरती प्रक्रियेत अडचणीत आले आहेत. यासाठी तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी

पदभरतीत अडकले कर्मचारी-अधिकारी
गोंदिया : स्वत:ला पारदर्श असल्याचा कांगावा करणारेजिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी अखेर भरती प्रक्रियेत अडचणीत आले आहेत. यासाठी तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
शासनाने दिलेल्या मंजूरीपेक्षा अधिक पदे भरण्यात आल्याचा ठपका गोंदिया जिल्हा परिषदेवर ठेवण्यात आला. मंजूरीपेक्षा अधिक लोकांना नोकरी देऊन नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या संदर्भात १ आॅगस्ट २०१३ रोजी मुकाअ डी.डी. शिंदे यांनी ग्राम विकास व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव यांना सदर घोटाय्याची माहिती त्या पत्रात दिली. या पत्रात जि.प.च्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची भरती घेतांना अनागोंदी कारभार करण्यात आला. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नागपूरच्या विभागीय कार्यालयामार्फत आठ पानाच्या रिपोटरमध्ये या घोटाळ्याची माहिती देण्यात आली. यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
मागील अनेक वर्षापासून जि.प. भाजपच्या हातात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी यशवंत गेडाम यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या प्रकाराला ११ महिन्याचा कालावधी झाला तरीपण कसलीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यासाठी आठ पानाची रिपोर्ट ग्राम विकास व जलसंधारण मंत्रालयाला करण्यात आली.