कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरूच
By Admin | Updated: November 1, 2015 02:21 IST2015-11-01T02:21:08+5:302015-11-01T02:21:08+5:30
येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पांढरी, रेंगेपार, हलबीटोला, गोंगले, डुंडा, सितेपार,...

कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरूच
पांढरी : येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पांढरी, रेंगेपार, हलबीटोला, गोंगले, डुंडा, सितेपार, शिकारीटोला, मालीजुंगा, बकीटोला या परिसरातून विद्यार्थी वर्ग ५ ते १२ वी पर्यंत शिक्षण घेण्याकरिता येतात. येथील विद्यार्थी संख्या अंदाजे हजार ते बाराशे पर्यंत आहे. ३५ ते ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परंतुयेथील कर्मचारी गोंदिया, साकोली, सडक-अर्जुनी येथून अपडाऊन करतात. पालक वर्गाने व शासनाने शाळेच्या ठिकाणी राहावे असे निर्देश असून या निर्देशाला न जुमानता अपडाऊन करणे सुरू आहे. येथील मुख्याध्यापक के.जी.कापगते सुध्दा साकोलीवरून दररोज अपडाऊन करताना दिसत आहे. यापूर्वी या शाळेत डी.व्ही.कापगते, धारगावे, हुकरे, आर.जे.लोथे, श्यामकुवर मुख्याध्यापक ब्यांनी आपला दबदबा कायम ठेवला होता. सर्व कर्मचारी पांढरी येथे राहत असत. त्यामुळे विद्यार्थ्यानचे नुकसान होत नव्हते. पाच ते सहा वर्षापासून या शाळेतील कर्मचारी बाहेर गावावरून अपडाऊन करीत असल्याने पांढरी परिसर ओसाड पडलेला आहे. या शाळेवर शिस्त नसल्यामुळे काही कर्मचारी कार्यालयात बसून दारू पिणे, शाळेत पार्टीचे आयोजन करणे असे प्रकार करतात.
येथील कर्मचारी खोटे ग्रामपंचायतचे भाड्याने राहात असल्याचे दाखले घेऊन घरभाडे भत्ता उचलतात. छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा अपडाऊन कधी थांबणार? कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गावातील प्रतिष्ठीत जनतेने व पालक वर्गाने केली आहे. (वार्ताहर)