रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:50+5:302021-03-18T04:28:50+5:30
एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रांवर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे ...

रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रांवर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन केले जात नाही. नागरिक या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
गोंदिया : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भर घालण्यात आली असली तरी हे साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी होत आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
गोंदिया : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
महामार्गावरील अंडरपास मार्ग प्रलंबित
सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वरील डोंगरगाव डेपो, सशीकरण पहाडी व डुग्गीपार परिसरात विविध जातीच्या वन्यजीव प्राण्यांना रस्ते अपघातात नेहमीच जीव गमवावा लागतो. याकरिता अंडरपास मार्गाची मागणी केली जात आहे. हा रस्ता प्रलंबित असल्याने मात्र वन्यजिवांना नाहक जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अंडरपास मार्ग लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी केली जात आहे.
बनगाव येथे घाणीचे साम्राज्य
आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक ६ मधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचरापेटी लावण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता नगर प्रशासनाने प्रभागात लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी आहे.
दुग्ध भेसळीच्या चौकशीची मागणी
सौंदड : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करून पदार्थ तयार करण्याच्या सपाटा सुरू आहे. याची चौकशी करण्याची मागणी आहे.
शेंडा परिसरात नेटवर्कची समस्या
सडक -अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदीटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरी मोबाईल टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते.
अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी
गोरेगाव : कोरोनामुळे विवाह समारंभावरही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यांपासून बंद असलेली सामाजिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहे.
रस्ता बांधकामामुळे गावकरी अडचणीत
नवेगावबांध : कोहमारा ते नवेगावबांध-वडसा तसेच सानगडी - नवेगावबांध या राज्य महामार्गाचे काम शिवालया कंपनीद्वारे केले जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडा नसल्याने त्रास होत आहे.