कर्मचारी संपावर ठाम, बस आगारातच उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST2021-12-22T05:00:00+5:302021-12-22T05:00:16+5:30

संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतरही कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम झालेला नसल्याचे जिल्ह्यातील दोन्ही आगारांत दिसून येत आहे.

Employees insist on strike, stand in the bus depot | कर्मचारी संपावर ठाम, बस आगारातच उभ्या

कर्मचारी संपावर ठाम, बस आगारातच उभ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :­  २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला आता २ महिने होत आले आहेत. या संपामुळे एकीकडे महामंडळाचे नुकसान होत असतानाच सर्वसामान्य प्रवशांनाही चांगलाच फटका बसत असून त्रास सहन करावा लागत आहे. संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतरही कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम झालेला नसल्याचे जिल्ह्यातील दोन्ही आगारांत दिसून येत आहे. कारण, दोन्ही आगारांत आहे तीच स्थिती असून, पूर्वीपासून कामावर येत असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांना सोडून आता अन्य कर्मचारी कामावर परतून आले नाहीत. परिणामी पूर्ण फेऱ्या बंद असून, दोन्ही आगारांतील बस आगारातच होत्या तशाच उभ्या आहेत. 

४५ दिवसांत ५.६२ कोटींचे नुकसान 

nकर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला आता ४५ दिवसांपेक्षा जास्तीचा काळ झाला आहे. यामुळे दोन्ही आगारांना चांगलाच  फटका बसला आहे. आगारनिहाय बघितल्यास गोंदिया आगाराला सुमारे तीन कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांचा, तर तिरोडा आगाराला सुमारे एक कोटी ८० लाख रुपयांचा फटका बसला आहे. एकंदर सुमारे पाच कोटी ६२ लाख ५० हजार रुपयांचे दोन्ही आगारांचे मिळून नुकसान झाले आहे. 

कर्मचाऱ्यांवर कारवाईची चिन्हे
nसंपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाने कारवाई केली असून, यामध्ये गोंदिया आगारातील २२, तर तिरोडा आगारातील ३१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, आता परिवहन मंत्र्यांनी संप मिटला अशी घोषणा केल्यानंतरही कर्मचारी कामावर परतून आलेले नाहीत. अशात त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांवर विभागीय कार्यालयाकडून कारवाई केली जात असल्याने पुढे काय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

संपामुळे  पदरात काय पडले

दुखवटा सुरूच राहणार आम्ही संपात नसून आमचे जे कर्मचारी मृत्यूमूखी पडले. त्यांचा दुखवटा करीत आहोत. जोपर्यंत महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हा दुखवटा सुरूच राहणार.     सईद शेख (कर्मचारी)
 

आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे, आम्ही त्यांच्या दुखवट्यात आहोत आणि जोपर्यंत महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा दुखवटा सुरूच राहणार आहे. 
- अमोल काजळे (कर्मचारी)

जिल्ह्यात आहे तीच स्थिती 
आगारात पूर्वीपासून जेवढे कर्मचारी कामावर येत होते, तेवढेच कर्मचारी कामावर येत आहेत. आतापर्यंत अन्य कर्मचारी कामावर परतून आलेले नाहीत. परिणामी, पूर्ण फेऱ्या बंद असून बस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे संप केव्हा मागे होतो याकडे लक्ष आहे.
- पंकज दांडगे 
आगारप्रमुख, तिरोडा 

 

Web Title: Employees insist on strike, stand in the bus depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.