कर्मचारी व पर्यवेक्षकांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 28, 2016 01:12 IST2016-10-28T01:12:07+5:302016-10-28T01:12:07+5:30
महाराष्ट्र शासनाचे सर्व विभागांना निर्देश देण्यात आले की दिवाळी २८ तारखेपासून असल्याने कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे

कर्मचारी व पर्यवेक्षकांची दिवाळी अंधारात
तिरोडा : महाराष्ट्र शासनाचे सर्व विभागांना निर्देश देण्यात आले की दिवाळी २८ तारखेपासून असल्याने कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, असे असताना सुध्दा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पं.स.तिरोडा येथील कर्मचारी व अंगणवाडी पर्यवेक्षक यांचे वेतन अजूनपर्यंत झालेले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच होणार असल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, आर.के.दुबे हे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर चार्जवर असून त्यांच्या वेळखाऊ वृत्तीमुळे येथील कर्मचारी व अंगणवाडी पर्यवेक्षीका यांचे सप्टेंबर व आॅक्टोबर दोन महिन्याचे वेतन अजूनही झालेले नाही.
यामुळे दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आर्थिक संकटात हे कर्मचारी सापडलेले आहेत.
वेतन उशीर का होते, ज्यांच्याकडे हे कार्य आहे त्यांनी उशीर का केला. याला जवाबदार कोण, याची सखोल चौकशी करून संबंधीत अधिकाऱ्यावर योग्य कार्यवाही जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हाधिकारी गोंदिया यांनी करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)