ट्रेसिंग, टेस्टिंग व लसीकरणावर भर द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST2021-04-29T04:22:04+5:302021-04-29T04:22:04+5:30
लसीकरणावर भर देण्याच्या सूचना, स्थानिक डॉक्टरांना विश्वासात घ्या गोंदिया : कोरोनाने ग्रामीण भागात प्रवेश केला असून ग्रामीण भागात सकारात्मक ...

ट्रेसिंग, टेस्टिंग व लसीकरणावर भर द्या ()
लसीकरणावर भर देण्याच्या सूचना, स्थानिक डॉक्टरांना विश्वासात घ्या
गोंदिया : कोरोनाने ग्रामीण भागात प्रवेश केला असून ग्रामीण भागात सकारात्मक आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग त्वरित आटोक्यात आणण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश आ. विनोद अग्रवाल यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
आमदार विनोद अग्रवाल यांनी मंगळवारी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. तालुका आरोग्य अधिकारी वेदप्रकाश चौरागडे संपूर्ण दौऱ्यात उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र दासगांव, काटी, रावणवाडी, कामठा, मोरवाही आणि ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेत येणाऱ्या विविध समस्या जाणून घेतल्या व काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
टेस्टिंग, ट्रेसिंग आणि लसीकरणासाठी जनजागृतीवर भर देण्यास सांगितले. लसीकरणासंदर्भात अनेक प्रकारच्या अफवा तसेच मनात असलेल्या भीतीमुळे नागरिक लसीकरण करण्यासाठी पुढे येत नसल्याचे सांगितले. यासाठी गावात समिती नेमून लसीकरणाबाबत असलेल्या अफवा दूर करून जनजागृती करून लसीकरणावर भर द्या. काेरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य आहे. यासाठी संशयित रुग्णांचे नमुने तपासणीचे प्रमाण वाढवून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी करावा, असे आ. विनोद अग्रवाल यांनी सांगितले. या वेळी रामराज खरे, सुखलाल बोपचे, दिनेश तुरकर, गुनिराम सेवईवार, चुनेश तुरकर, धनंजय तुरकर, ज्ञानचंद जमईवार, अनिल मते, आशिफ शेख, अशोक गोखले, लोकेश बन्सपाल, गोवर्धन तितरमारे, धनीराम अम्बुले, बंटी तुरकर, मुन्ना तुरकर, शिव भोयर, अदास दंदरे, टिमेंद्र तुरकर, नीलू असाटी, राजेश टेंभरे, रंजीत तुरकर, बबलू उइके उपस्थित होते.
...............
मृत्युदर आटोक्यात आणा
सर्दी, खोकला, ताप आल्यास इतर इलाज किंवा घरघुती इलाज न करता डॉक्टरांना भेटून योग्य उपचार वेळीच झाल्यास कोरोनाचा वाढता मृत्युदर आटोक्यात आणणे शक्य आहे. ग्रामीण जनतेचा शासकीयपेक्षा ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांवर अधिक विश्वास आहे. याकरिता प्रशासनाने स्थानिक डॉक्टर, आशा सेविका आणि सरकारी आरोग्य व्यवस्था यांच्यात समन्वय साधावा. अनेक रुग्ण घरगुती इलाज केल्याने दगावत आहेत आणि काही रुग्णांना टायफाईड म्हणून उपचार देण्यात येत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींची दखल घेत वेळीच उपाययोजना करण्यास आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले.
..........