महिलांकडून आपकारीटोल्यात दारुबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 00:50 IST2017-03-26T00:50:15+5:302017-03-26T00:50:15+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आपकारीटोला येथील महिलांनी पुढाकार घेऊन गावात दारुबंदी केली.

महिलांकडून आपकारीटोल्यात दारुबंदी
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आपकारीटोला येथील महिलांनी पुढाकार घेऊन गावात दारुबंदी केली. त्याचप्रमाणे बाहेरील दारु पिणाऱ्यांच्या माहितीसाठी रस्त्याच्या कडेला दर्शनी भागात ‘गावात दारुबंदी आहे,’ असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले.
या गावात ९५ टक्के आदिवासी समाजाचे लोक पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहेत. गावची लोकसंख्या ३०० च्या आसपास असून ८० घरांची वस्ती आहे. या गावातील फक्त एक दोनच लोक दारुच्या व्यवसायात गुंतले होते. मात्र पिणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. यावर अंकुश लावण्यासाठी गावातील महिलांनी व काही सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घेऊन दारुबंदी समिती गठित केली. सर्वप्रथम दारु विक्रेत्यांना बोलावून समजाविण्यात आले. तरीही दारु विक्रेते आपला व्यवसाय सोडायला तयार नव्हते. शेवटी महिलांनी दारु विक्रेत्यांकरुन दारु हस्तगत करून पोलिसांनाही पाचारण केले. मात्र पाहिजे तशी कारवाई न करता त्यांना सोडण्यात आले. त्यामुळे या व्यवसायास पोलिसांचीही मुक संमती तर नाही ना, असा प्रश्न वारंवार उद्भवत होता.