शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीनंतर आता हत्तींच्या कळपाचे संकट, सहा महिन्यांनंतर एन्ट्री, भरनोली परिसरात धानाच्या पुंजण्याची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 18:43 IST

शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून नागणडोहमार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली. राजोली भरनोली येथील शेतकरी नीलकंठ बुधराम हारमी यांच्या शेतातील पाच एकरातील धानाच्या पुंजण्याची पूर्णपणे नासधूस केली. 

प्रकाश वलथरे - केशोरी : अवकाळी पावसाने मागील आठवड्यात सलग चार दिवस हजेरी लावून धानपिकांचे मातेरे करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. या संकटातून शेतकरी कसाबसा सावरत असताना शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात परत गेलेल्या हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली, नागणडोह परिसरात एन्ट्री करीत शेतातील धानाच्या पुंजण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तर हत्तींच्या कळपाचा मुक्काम याच परिसरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अवकाळीनंतर आता शेतकऱ्यांवर हत्तींच्या कळपाचे संकट उभे ठाकले आहे.

पश्चिम बंगालमधून दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी एन्ट्री करीत मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह, राजोली भरनोली, रामपुरी, बाक्टी व नवेगावबांध या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यानंतर हा हत्तींचा कळप नागणडोहमार्गे गडचिरोली जिल्ह्यात परत गेला होता. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून पुंजणे शेतात रचून ठेवले आहे. 

मागील आठवड्यात सलग अवकाळी पाऊस झाल्याने मळणीची कामे थांबली होती. तर दोन तीन दिवसांपासून वातावरणाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांनी धानाच्या मळणीची कामे सुरू केली आहेत. दरम्यान, शनिवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून नागणडोहमार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली. राजोली भरनोली येथील शेतकरी नीलकंठ बुधराम हारमी यांच्या शेतातील पाच एकरातील धानाच्या पुंजण्याची पूर्णपणे नासधूस केली. 

यामुळे या शेतकऱ्यावर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान, भरनोली येथील शेतकऱ्यांनी याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वन कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच भरनोली येथे पोहोचत नुकसानीचे पंचनामे केले. तसेच हत्तींच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी पथक पाठविले.

कळपाचा भरनोली परिसरातच मुक्कामगडचिरोली जिल्ह्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाचा मुक्काम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली, नागणडोह परिसरात आहे. या कळपात २५ च्या वर हत्ती असल्याची माहिती आहे. या कळपाचा याच परिसरात मुक्काम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर अवकाळी पावसानंतर आता हत्तींच्या कळपापासून धानाच्या पुंजण्याचे संवर्धन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गावकऱ्यांना सजग राहण्याचा इशाराहत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली असून भरनोली परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घातला आहे. तर हत्तींच्या कळपाचा मुक्काम याच परिसरात असल्याने वन विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांना सजग राहण्याचा इशारा दिला आहे.

वन विभागाचे कर्मचारी हत्तींच्या कळपावर नजर ठेवून -रानटी हत्तींचे कळप जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक हत्तींच्या कळपाच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीPaddyभात