धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा खून
By Admin | Updated: February 27, 2017 00:21 IST2017-02-27T00:21:30+5:302017-02-27T00:21:30+5:30
धाकड्या भावाने मद्यपी असलेल्या थोरल्या भावावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना गोरेगाव तालुक्याच्या

धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा खून
गोंदिया : धाकड्या भावाने मद्यपी असलेल्या थोरल्या भावावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथे शनिवार (दि.२५) च्या रात्री ११.३० वाजतादरम्यान घडली.
रविंद्र सुरेंद्र नेताम (२३) रा. घोटी असे मृताचे नाव आहे. आरोपीचे नाव विशाल सुरेंद्र नेताम (२१) असे आहे.या घटनेसंदर्भात त्यांचे वडील सुरेंद्र नेताम यांनी पोलिसात तक्रार केली आहे. रवींद्र शनिवारच्या रात्री मद्यप्राशन करून घरी आला.
घरच्यांना शिविगाळ करून मारहाण करीत होता. यावेळी संतापलेल्या विशालने लोखंडी पाईपने त्यांच्यावर हल्ला केला. घटनेनंतर रविंद्रला उपचारासाठी गोरेगावच्या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.
परंतु तेथून त्याला गोंदियाला रवाना करण्यात आले. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर रविंद्रचा मृत्यू झाला.
घटनेनंतर विशाल नेताम स्वत: पोलीस ठाण्यात गेला. त्याने आपला गुन्हा कबुल केला. गोरेगाव पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)