वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:54 IST2021-03-04T04:54:50+5:302021-03-04T04:54:50+5:30

तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ग्राम चिचटोला येथे सोमवारी (दि.१) सकाळी घडली. लक्ष्मण गांडो भोगारे (७०,रा. चिचटोला) ...

Elderly man killed in tiger attack | वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार

तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ग्राम चिचटोला येथे सोमवारी (दि.१) सकाळी घडली. लक्ष्मण गांडो भोगारे (७०,रा. चिचटोला) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

सोमवारी सकाळी लक्ष्मण भागोरे गुरे चारण्यासाठी गेवर्धा-केशोरी मार्गावरील जंगलात गेले असता ते घरी परत आलेच नाही. यावर घरच्यांनी शोध घेतला असता ते जंगलात मृतावस्थेत आढळले. त्यांच्यावर वन्यप्राण्यांचा हल्ला झाला असून हल्ल्यात ते जागीच ठार झाले आहे. घटनेचा अधिक तपास वनविभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी करीत आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुका जंगलव्याप्त असल्याने दिवसेंदिवस मानवावर वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत. तालुक्यातील अनेकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला आहे. तालुक्यातील अनेक गावात रात्रीच्या वेळी वन्य प्राणी प्रवेश करून कोंबड्या, बकरे व पाळीव प्राणी यांच्यावर हल्ले करीत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

Web Title: Elderly man killed in tiger attack