हक्काच्या विसाव्यापासून शहरातील वृद्ध वंचित

By Admin | Updated: October 1, 2015 02:10 IST2015-10-01T02:10:06+5:302015-10-01T02:10:06+5:30

आयुष्याच्या संध्याकाळी एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते ती कोणाच्यातरी सोबतीची.

Elderly deprived of the City | हक्काच्या विसाव्यापासून शहरातील वृद्ध वंचित

हक्काच्या विसाव्यापासून शहरातील वृद्ध वंचित

आज ज्येष्ठ नागरिक दिन : ‘फेस्कॉम’च्या पुढाकाराने अनेक सवलती
गोंदिया : आयुष्याच्या संध्याकाळी एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते ती कोणाच्यातरी सोबतीची. अशी सोबत करण्यासाठी गोंदियात ज्येष्ठ नागरिक संघही कार्यरत आहे. पण त्यांना विसावा घेण्यासाठी, दोन क्षण निवांत बसण्यासाठी हक्काची जागाच नाही. गोंदियातील ज्येष्ठ नागरिक संघ त्यासाठी अनेक दिवसांपासून धडपड करीत आहे.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त संघाचे सचिव शांतीलाल दखने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहरातील सुभाष गार्डनमध्ये आम्ही एकत्र येत होतो. त्याच ठिकाणी आमच्या बैठकाही होतात. पण दोन वर्षांपासून नगर परिषदेने त्या ठिकाणी क्लब सुरू केला. त्यामुळे आम्हाला हक्काची अशी कोणतीच जागा नाही. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व बैठकीसाठी हक्काची जागा मिळावी यासाठी नगर परिषदेकडे मागणी करण्यात आली आहे. शहरातील बाई गंगाबाई महिला रूग्णालयामागील २० हजार चौ.फू. जागेतून ज्येष्ठ नागरिक संघाच्या इमारतीसाठी जागा मंजूर करण्यात आल्याचे तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले होते. ही जागा शहराच्या मध्यभागी असल्याने याच ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्याचा मानस होता. पण त्या प्रस्तावाचे नंतर काय झाले कळले नाही.
राज्य सरकारने फेडरेशन आॅफ सिनीअर सिटीझन्स आॅर्गनायजेशन महाराष्ट्र (फेस्कॉम) यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे गोंदियात ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचे काम करीत आहे. हा संघ ज्येष्ठ नागरिकांचे कागदपत्र तपासून त्यानुसार अर्ज व ओळखपत्र तहसीलदारांकडे पाठवितात.

Web Title: Elderly deprived of the City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.