हक्काच्या विसाव्यासाठी वृद्धांची धडपड सुरूच

By Admin | Updated: September 30, 2014 23:37 IST2014-09-30T23:37:19+5:302014-09-30T23:37:19+5:30

वृद्धत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ. हे वृद्धत्व अनेकांसाठी एकाकीपणा आणणारे असते. हा एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते

Elderly agitation for the rest of the claim has begun | हक्काच्या विसाव्यासाठी वृद्धांची धडपड सुरूच

हक्काच्या विसाव्यासाठी वृद्धांची धडपड सुरूच

गोंदिया : वृद्धत्व म्हणजे आयुष्याची संध्याकाळ. हे वृद्धत्व अनेकांसाठी एकाकीपणा आणणारे असते. हा एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते ती कोणाच्यातरी सोबतीची. अशी सोबत करण्यासाठी गोंदियात ज्येष्ठ नागरिक संघही कार्यरत आहे. पण त्यांना विसावा घेण्यासाठी, दोन क्षण निवांत बसण्यासाठी हक्काची जागाच नाही. गोंदियातील ज्येष्ठ नागरिक संघ सध्या यासाठी धडपड करीत आहे.
ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला या संघाचे सचिव शांतीलाल दखने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहरातील सुभाष गार्डनमध्ये आम्ही एकत्र येत होतो. त्याच ठिकाणी आमच्या बैठकाही होतात. पण काही दिवसांपासून नगर परिषदेने त्या ठिकाणी क्लब सुरू केला. त्यामुळे आम्हाला हक्काची अशी कोणतीच जागा नाही. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व बैठकीसाठी हक्काची जागा मिळावी यासाठी नगर परिषदेकडे मागणी करण्यात आली आहे. शहरातील बाई गंगाबाई महिला रूग्णालयामागील २० हजार चौ.फू. जागेतून ज्येष्ठ नागरिक संघाच्या इमारतीसाठी जागा मंजूर करण्यात आल्याचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. ही जागा शहराच्या मध्यभागी असल्याने याच ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यात येईल, असे संघाचे अध्यक्ष निलकंठ ब्राह्मणकर यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने फेडरेशन आॅफ सिनीअर सिटीझन्स आॅर्गनायजेशन महाराष्ट्र (फेस्कॉम) यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे गोंदियात ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचे काम करीत आहे. हा संघ ज्येष्ठ नागरिकांचे कागदपत्र तपासून त्यानुसार अर्ज व ओळखपत्र तहसीलदारांकडे पाठवितात. त्यावर तहसीलदारांची स्वाक्षरी झाली की त्या नागरिकांना शासनाच्या विविध सोयीसुविधांचा लाभ घेता येतो. बुधवारी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त फेस्कॉमची बैठक ३ वाजता सुभाष गार्डनमध्ये होणार आहे.

Web Title: Elderly agitation for the rest of the claim has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.