हवनाच्या जेवणातून झाली आठ जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST2021-02-05T07:51:03+5:302021-02-05T07:51:03+5:30
दरेकसा : घरी असलेल्या हवनाच्या जेवणातून ८ जणांना विषबाधा झाल्याची घटना ग्राम जमाकुडो येथे रविवारी (दि.२४) घडली. विषबाधा झालेल्या ...

हवनाच्या जेवणातून झाली आठ जणांना विषबाधा
दरेकसा : घरी असलेल्या हवनाच्या जेवणातून ८ जणांना विषबाधा झाल्याची घटना ग्राम जमाकुडो येथे रविवारी (दि.२४) घडली. विषबाधा झालेल्या या ८ जणांना सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते. त्यातील ३ जणांची सुटी करण्यात आली असून, ५ जणांवर उपचार सुरू आहेत.
ग्राम जमाकुडो निवासी हरिचंद मोहबे (४०) यांच्या घरी शनिवारी (दि.२३) हवनाचा कार्यक्रम होता. यानिमित्त जेवण होते व या कार्यक्रमाला नातेवाईक व शेजारी असे २०-२५ जण उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजेनंतर जेवण झाले, तर उरलेले अन्न रविवारी (दि.२४) काही लोकांनी खाल्ले. यानंतर हरिचंद मोहबे, अमोल मोहबे (१७), रवीता मोहबे (३०), श्रृती मोहबे (७), विशाखा धनराज मोहबे (१६), विनय मोहबे (१४), जगदीश मोहबे (३६) व कपिल मोहबे (८), या ८ जणांना मळमळ, उलटी, जुलाब, डोके जड होणे तसेच थंडीताप अशी लक्षणे दिसून आली. त्यांना प्राथमिक उपचार करून सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले. सोमवारी (दि.२५) याबाबत माहिती घेतली असता या सर्वांची प्रकृती बरी असून ३ जणांना सुटी देण्यात आली, तर उर्वरित ५ जणांवर उपचार सुरू असल्याचे दरेकसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश गवई यांनी सांगितले.