आठ शिकाऱ्यांना अटक

By Admin | Updated: October 1, 2015 02:02 IST2015-10-01T02:02:08+5:302015-10-01T02:02:08+5:30

तालुक्याला लागून असलेल्या नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील चिचघाट जवळच्या कंपार्टमेंट नंबर २०२ मध्ये दोन रानटी डुकरांची शिकार करताना आठ आरोपींना पकडण्यात आले.

Eight hunters arrested | आठ शिकाऱ्यांना अटक

आठ शिकाऱ्यांना अटक

रानडुकराची शिकार : राष्ट्रीय उद्यानातील घटना
सडक अर्जुनी : तालुक्याला लागून असलेल्या नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील चिचघाट जवळच्या कंपार्टमेंट नंबर २०२ मध्ये दोन रानटी डुकरांची शिकार करताना आठ आरोपींना पकडण्यात आले. ही कारवाई पहाटे ४ वाजता वन्यजीव विभागाने केली.
प्राप्त माहितीनुसार, पहाटे वन्यजीव विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना आठ आरोपी दोन रानडुकरांची शिकार करीत असल्याचे त्यांना आढळले. त्या सर्वांना वनकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यात जीवन काशिराम शेंडे (२२), दिगंबर चंदन मेंढे (२२), प्रदीप चंदन मेंढे (१९), डुडेश्वर केवलराम पाऊलझगडे (३३), सुखराम दिनेश बोहरे (२९), संदीप संपत मेश्राम (१९) हे सहा व दन बाल आरोपी आहेत. हे सर्वजण तालुक्यातील कनेरी राम येथील रहिवासी आहेत.
गस्तीवर असताना वनकर्मचाऱ्यांना गावठी कुत्र्यांचा आवाज आला. त्या दिशेने हे कर्मचारी पुढे गेले आणि सर्व शिकाऱ्यांना अंधारात मोठ्या शिताफीने पकडले. ही कारवाई वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक अशोक खुणे, उपविभागीय अधिकारी गुप्ता, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश दोनोडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी क्षेत्र सहायक शैलेंद्र भदाने, वनरक्षक दुलीचंद सूर्यवंशी, प्रकाश पानोडे, परशुराम जोशी, अमोल रंगारी, अमोल चौबे, नवखरे, हिरू कापगते आणि वनमजूर धनलाल नागपुरे आदींनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Eight hunters arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.