साखरीटोला येथे आठ जोडपी बांधल्या गेली परिणय सूत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:45 IST2016-04-25T01:45:34+5:302016-04-25T01:45:34+5:30

सामूहिक विवाहाचे अनेक फायदे असून गरीब, सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरत आहे.

Eight couples built in Sakaryito | साखरीटोला येथे आठ जोडपी बांधल्या गेली परिणय सूत्रात

साखरीटोला येथे आठ जोडपी बांधल्या गेली परिणय सूत्रात

समितीचे १३वे वर्ष : कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा
साखरीटोला : सामूहिक विवाहाचे अनेक फायदे असून गरीब, सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरत आहे. जे पालक आपल्या मुला-मुलींचा विवाह सामूहिक विवाह सोहळ्यात लावून देतात त्यांचा खऱ्या अर्थाने जाहीर सत्कार करावा. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल व अधिक संख्येने लोक सामूहिक विवाह सोहळ्याकडे आकर्षित होतील, असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले.
साखरीटोला येथे पार पडलेल्या कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
रविवारी २४ एप्रिलला सकाळी ११.०५ वाजता जि.प. केंद्र प्राथमिक शाळेच्या पटांगणावर कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात आठ जोडपी विवाहबध्द झाली. या वेळी अतिथी म्हणून आ. संजय पुराम, आ. राजेंद्र जैन, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, माजी वनमंत्री भरत बहेकार, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आ. रामरतन राऊत, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प. सदस्य लता दोनोडे, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, सभापती हिरालाल फाफनवाडे, सरपंच संगीता कुसराम, सहेषराम कोरोटे, संपत सोनी, सरपंच रेखा फुंडे, माजी जि.प. सदस्य कमल बहेकार, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, सुनील अग्रवाल, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, उपसरपंच भूमेश्वर मेंढे, समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे, युगराज कोरे, देवराम चुटे, डॉ. संजय देशमुख, संजय देशमुख, संजय दोनोडे, टी.जी. फुंडे, राजू काळे, डॉ. अजय उमाटे, संतोष अग्रवाल, श्यामलाल दोनोडे उपस्थित होते.
गायत्री मंत्राने विवाहाची सुरूवात करण्यात आली. मंगलाष्टकांनी विवाह पार पडला. मागील १३ वर्षापासून युवा कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा साजरा केला जातो. लग्न झाल्यानंतर समितीतर्फे विवाहाचे प्रमाणपत्र तसेच शुभमंगल योजनेचा लाभ मिळवून दिला जातो. विवाहीत जोडप्यांना विविध ट्रस्टच्या वतीने भेटवस्तू दिल्या जातात.
यात मनोहर पटेल अ‍ॅकेडमी, प्रताप मेमोरीयल ट्रस्ट, आ. संजय पुराम यांच्याकडून विशेष भेट वस्तू, आ. राजेंद्र जैन तसेच नरेश माहेश्वरी यांच्याकडून विशेष भेटवस्तू, संपत सोनी, साखरीपाट बाबा देवस्थानतर्फे तसेच सरपंच संगीता कुसराम यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
संचालन प्रभाकर दोनोडे यांनी केले. आभार डॉ. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. रमेश बोहरे, प्रकाश दोनोडे, रामदास हत्तीमारे, नामदेव दोनोडे, संजय बागडे, निलकंठ दोनोडे, मनोज चुटे, अरविंद फुंडे, संतोष बोहरे, देवेंद्र मुनेश्वर, मंजू दोनोडे, प्रमिला दोनोडे, इंदू कोरे, सुषमा देशमुख, मिनू शिवणकर तसेच समितीच्या सर्व पदाधिकाारी व सदस्यांनी सहकार्य केले. तसेच श्री विद्या गर्ल्स हायस्कूल, बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय, जि.प.केंद्र शाळा, जि.प.हायस्कूल यांचे विशेष सहकार्य लाभले. (वार्ताहर)

Web Title: Eight couples built in Sakaryito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.