तंटामुक्त मोहिमेचे मूल्यमापन करण्यासाठी आठ समित्या
By Admin | Updated: May 24, 2014 23:43 IST2014-05-24T23:43:46+5:302014-05-24T23:43:46+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सन २0१३-१४ या वर्षातील तंटामुक्तीच्या स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या

तंटामुक्त मोहिमेचे मूल्यमापन करण्यासाठी आठ समित्या
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सन २0१३-१४ या वर्षातील तंटामुक्तीच्या स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या आठ ही तालुक्यातील समित्या गठित करण्यात आल्या. गोंदिया तालुक्याच्या समितीत अध्यक्ष तहसीलदार संजय पवार, सचिव म्हणून रावणवाडीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सदस्य म्हणून सरकारी वकील पी.एस. तिरपुडे, पं.स. सभापती सरिता अंबुले व संतोष शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. आमगाव तालुक्याच्या समितीत अध्यक्षपदी तहसीलदार राजीव शक्करवार, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक बारीकराव मडावी, सदस्य सरकारी वकील वाय.एस. राऊत, सभापती हनुवंत वट्टी व दीपक शर्मा यांची निवड करण्यात आली. तिरोडा तालुक्याच्या अध्यक्षपदी तहसीलदार संजय नागटिळक, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक वसंत लबदे, सदस्य म्हणून सरकारी वकील एच.पी. रणदिवे, सभापती ललिता जांभूळकर, प्रदीप तापणकर यांची निवड करण्यात आली. गोरेगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी तहसीलदार डी.ए. सपाटे, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक रवीन्द्र शिंदे, सदस्य म्हणून सरकारी वकील कु. एस.आर. तिवारी, सभापती चित्रकला चौधरी, प्रमोद नागनाथे, सालेकसा तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार जी.एन. खापेकर, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक एस.पी. रणदिवे, सदस्य म्हणून सरकारी वकील प्रदीप सेंगरे, सभापती छाया बल्हारे व पत्रकार प्रतिनिधी सागर काटेखाये यांची निवड करण्यात आली आहे. देवरी तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार रवीन्द्र चव्हाण, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक संजू जॉन, सदस्य म्हणून सरकारी वकील एस.एन. जैन, सभापती कामेश्वर निकोडे व देवेंद्र सेलोकर यांची निवड करण्यात आली. सडक/अर्जुनी तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार एन.जी. उईके, सदस्य सचिव म्हणून पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सरकारी वकील पी.एस. आगाशे, सभापती निर्मला उईके व निशांत राऊत यांची निवड करण्यात आली. अर्जुनी/मोरगाव तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार संतोष महाले, सदस्य सचिव म्हणून पोलीस निरीक्षक संदीप भागवत, सरकारी वकील एम. के. बोरीकर, सभापती तानेश ताराम व विनायक राखडे यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही समिती गठित करण्यास उशीर झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)