आठही आरोपींना २२ पर्यंत एमसीआर
By Admin | Updated: June 10, 2017 02:10 IST2017-06-10T02:10:55+5:302017-06-10T02:10:55+5:30
देऊळगाव-बोदरा येथील शिवलाल भांडे यांच्या खूनाच्या आरोपात अटकेत असलेल्या आठही आरोपींना ..

आठही आरोपींना २२ पर्यंत एमसीआर
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : देऊळगाव-बोदरा येथील शिवलाल भांडे यांच्या खूनाच्या आरोपात अटकेत असलेल्या आठही आरोपींना शुक्रवारी (दि.९) अर्जुनी-मोरगाव न्यायालयाने २२ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देऊळगाव-बोदरा निवासी शिवलाला नारायण भांडे यांचा मृतदेह २४ मे रोजी त्याच्या घरातच संशयास्पदरित्या दिसून आला होता. जमिनीच्या व्यवहारातून गावातील देवानंद झोळे (३५), दिनेश झोळे (२९), अंताराम झोळे (५९) प्रभू झोळे (३४), हेमराज बोरकर(४३), माधोराव झोळे (४५), रेखा झोळे (४०), रितेश झोळे (२३) यांनी खून केल्याची तक्रार शिवलाल यांच्या पत्नी मंदा यांनी पोलिसांत दिल्याने पोलिसांनी त्यांना २४ तारखेलाच अटक केली. यात तपासासाठी पोलिसांनी दोनदा पोलीस कोठडी मिळवून घेतली होती. मात्र ३ तारखेला न्यायालयाने त्यांना ९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. दरम्यान शुक्रवारी (दि.९) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणाचा उलगडा व्हावा यासाठी हे प्रकरण ३१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे .