शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण टॅबवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

गाव आदिवासींचे असून डोंगराने वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे. गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववान शिक्षकांनी केले.

ठळक मुद्देशिक्षकांना व्हावे लागले विद्यार्थी : येडमागोंदी शाळा ठरत आहे इतरांसाठी आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजिटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत.विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळेतही हे चित्र बघावयास मिळत आहे. येथील ३० विद्यार्थी टॅबवर शिक्षण घेत आहेत.महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून गडचिरोली जिल्ह्यापासून २ किमी. अंतरावरील व गोंदियापासून १२० किमी. अंतरावर डोंगराच्या कुशीत येडमागोंदी हे गाव वसलेले आहे. ४०० लोकसंख्या असलेले छोटेशे गाव गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात मिसपिरी केंद्रात येते. हे संपूर्ण गाव आदिवासींचे असून डोंगराने वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे. गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववान शिक्षकांनी केले.कल्पनेला भरारीचे पंख देत त्यांनी विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी तयार केले. यासाठी शिक्षकांना आधी विद्यार्थी व्हावी लागले. मूळात मराठी असलेल्या या शिक्षकांना आधी छत्तीसगडी भाषा शिकावी लागली व त्यांनी ती भाषा शिकून नंतर त्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविली. ही सर्व किमया प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या नेतृत्वात डॉ. किरण धांडे, सूचित्रा जाधव, संदिप सोमवंशी, दिलीप नवखरे, सुनील हरिणखेडे यांच्या मदतीने शक्य झाली. या लोकांनी या शाळेचा अध्ययनस्तर वाढविण्यासाठी शाळेला अनेक भेटी दिल्यात.दोन शिक्षक असलेल्या येडमागोंदी शाळेत ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध उपक्रम घेऊन सदाशिव पाटील नावाच्या शिक्षकाने रमेश बोरकर यांच्या मदतीने येथील विद्यार्थ्यांना मराठी व गणित विषयात प्रगत केले. ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्ययन-अध्यापन केले जाते. विद्यार्थी स्वत: कविता व गोष्टी तयार करतात. या विद्यार्थ्यांची बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी असली तरी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या प्रभावामुळे मराठी भाषा बोलतात. या शाळेला आता मुकेश गणवीर व प्रशांत बडोले हे दोन शिक्षक चालवितात. परिणामी ही शाळा १०० टक्के प्रगत म्हणून नावारुपास आली.‘जे राव न करे-ते गाव करे’ चा प्रत्यय येडमागोंदी या गावात आला. येथे पालक व शिक्षकांत उत्तम समन्वय आहे.गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शाळा डिजीटल व टॅबयुक्त करण्यासाठी आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा पालकांनी ७० हजार रुपयांची शाळेला मदत केली. गावकरी व शिक्षकांनी मिळून डिजीटल, टॅबयुक्त व गुणवत्ता पूर्ण शाळा तयार केली. या शाळेतील विद्यार्थी टॅबचा वापर करतात.विविध नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरु आहेत. अध्ययनस्तर वाढ या कृती कार्यक्रमामुळे आतापर्यंत ३०० च्या घरात शाळा शंभर टक्के पूर्ण झाल्या आहेत.-राजकुमार हिवारेप्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.मोर पैसा, मोर बॅँकविद्यार्थ्यांना बचतीचे महत्व कळावे तसेच बँकेचे व्यवहार समजावे या करीता शाळेत बचत बँक सुरु करण्यात आली. विद्यार्थ्याना ही बँक आपली वाटावी म्हणून बँकेला ‘मोर पैसा, मोर बॅँक’ हे नाव देण्यात आले.आप की अदालतछत्तीसगडी व गोंडी बोलीभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी भाषेत व्यक्त होता यावे, यासाठी शाळेत होणाºया वादविवादावर आधारीत विषय आप की अदालत या उपक्रमाच्या माध्यमातून सोडविले जातात. यामध्ये विद्यार्थी वादविवाद करतात. शिक्षक न्यायाधीशाची भूमिका बजावितात.माझी अभ्यासिकास्वयं अध्ययन व गटकार्य करण्यासाठी शालेय परिसरात विद्यार्थ्यांसाठी वाचनकुटी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्याचे ते छोटे अभ्यास केंद्र झाले आहे.पक्ष्यांसाठी पाणपोईविद्यार्थ्यांना पर्यावरण, वन्यजीव व वनसंपत्तींचे संवर्धन करण्यावर माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांचे पक्ष्यांप्रती प्रेम वाढावे, यासाठी ऊन्हात उडणाऱ्या पक्ष्यांसाठी शाळेतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणपोईतून करण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणnaxaliteनक्षलवादी