माने यांना शिक्षण सेवा रत्न पुरस्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:28+5:302021-02-05T07:50:28+5:30
बार्टीचे व्यवस्थापक हृदय गोडबोले, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे विनोद ठाकूर, समतादूत शारदा कळसकर, करुणा मेश्राम तसेच संविधान ...

माने यांना शिक्षण सेवा रत्न पुरस्कार ()
बार्टीचे व्यवस्थापक हृदय गोडबोले, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे विनोद ठाकूर, समतादूत शारदा कळसकर, करुणा मेश्राम तसेच संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, महेंद्र कठाणे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. माने हे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असतात. तसेच उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नि:शुल्क स्पर्धापरीक्षेचे सतत मार्गदर्शन करीत असतात. वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल आर.एस.पी.च्या माध्यमातून रस्ता सुरक्षाविषयक धडे देत असतात. कोविड-१९ काळातही त्यांनी विद्यार्थ्यांना सतत शिकविण्याचे कार्य केले असून अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च एन.जी.ओ.च्या माध्यमातून करतात. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य बी. एच. जीवानी, पर्यवेक्षक एच. ए. नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यू. सी. रंहागडाले, प्रा. सुनील लिचडे, पत्नी सुषमा माने, वडील मुलचंद माने, आई फुलवंता माने, नीला घरडे, फागोराव घरडे, धनंजय घरडे, मनोज घरडे, प्रवीण माने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले आहे.