पर्यावरण पूरक होळीचे दहन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:03+5:302021-03-31T04:29:03+5:30

क्षेत्र सहायक कार्यालयात आयोजित पर्यावरणपूरक होळी दहनप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा बोरकर, वनसमितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, क्षेत्र सहायक वासुदेव ...

Eco-friendly Holi Combustion () | पर्यावरण पूरक होळीचे दहन ()

पर्यावरण पूरक होळीचे दहन ()

क्षेत्र सहायक कार्यालयात आयोजित पर्यावरणपूरक होळी दहनप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा बोरकर, वनसमितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, क्षेत्र सहायक वासुदेव वेलतुरे, अमरचंद ठवरे, आनंद बोरकर, वनरक्षक धर्मराज कुंबडे, दिनेश मुनेश्वर, धनंजय कोकाटे, पीतांबर राऊत, सचिन कथले, सुखदेव राऊत, दिगंबर बडोले, सुरेश राऊत, मुनेश्वर नाकाडे, वामन बाळबुध्दे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यालयासमोरील प्रशस्त खुल्या जागेत पालापाचोळा व केरकचरा आदी टाकाऊ वस्तुंचा ढीग करण्यात आला. विधीवत पूजाअर्चा करण्यात आली व क्षेत्र सहायक वेलतुरे यांनी होलिकेचे दहन केले. याप्रसंगी वेलतुरे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगल कायम राहणे आवश्यक आहे. केरकचरा व पालापाचोळा जमा करुन त्याचे दहन केल्याने लाकडांची बचत होईल. वनाची संपत्ती अख्ख्या गावाची आहे तिचे जतन करणे सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. सरपंच बोरकर यांनी, वृक्षांची महत्ती सांगून जंगले कशी डौलदार राहतील यासाठी वन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजवावे असे सांगितले. संचालन दिनेश मुनेश्वर यांनी केले. आभार सुखदेव राऊत यांनी मानले.

Web Title: Eco-friendly Holi Combustion ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.