हंगामी रोजगारात तरूणाई व्यस्त
By Admin | Updated: May 8, 2015 01:04 IST2015-05-08T01:04:59+5:302015-05-08T01:04:59+5:30
उन्हाळ््याला सुरूवात होताच उन्हाळ््यात वापरावयाच्या वस्तूंना मोठया प्रमाणात मागणी असते.

हंगामी रोजगारात तरूणाई व्यस्त
गोंदिया : उन्हाळ््याला सुरूवात होताच उन्हाळ््यात वापरावयाच्या वस्तूंना मोठया प्रमाणात मागणी असते. कुलर, माठ, रेफ्रीजरेटर, टोपी, गॉगल्स, दुपट्टे, सनकोट, सुती कपडे यासारख्या वस्तूंचा वापर वाढतो. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत असतांना अनेक आरामदायी वस्तूंचा वापर नागरिक करीत आहेत. उन्हाळ््याच्या दिवसांत तरूण बेरोजगारांच्या हाताला काम मिळत असल्याने अनेकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होत असते.
कुलरची दुरूस्ती करणे, कुलरकरिता ताट्या बनविणे, एसीची दुरूस्ती करणे, माठ विकणे, गॉगल्स व दुपट्टे विकणे या व्यवसायावर अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. रणरणते उन्ह आणि वातावरणातील कोरडेपणा यामुळे उन्हाळा अनेकांना नकोसा वाटतो. मात्र उन्हाळ््यात बेरोजगारांच्या हाताला काम मिळत असल्याने अनेकांमध्ये उन्हाळ््याविषयी उत्साहही असतो. हाताला काम आणि पोटाला भाकर मिळेल, या आशेने तरूण छोटे-मोठे व्यवसाय करण्याकडे वळतात. शहरामंध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्र ीची मोठ-मोठी दुकाने लागली असतात. वस्तूची विक्र ी व दुरूस्ती उन्हाळ््यात सर्वात जास्त प्रमाणात होत असल्याने वर्षभर बेरोजगार राहणाऱ्या इलेक्ट्रीशियनला काम मिळत असते. उन्हाळा संपला की, घरोघरी कुलर अडगळीत टाकले जाते. नव्याने कुलर लावतांना दुरूस्ती करणे आवश्यक असते. अशा स्थितीत बेरोजगारांची मदत घेतली जाते.
आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक तरूणांना उन्हाळ््यात काम मिळत असते. एरवी घरोघरी जाऊन कामाची विचारणा करणाऱ्या तरूणांना उन्हाळ््यात रोजगाराची पर्वणीच असते. त्यामुळे रोजगाराचा शोध न करता बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होते. कार्यालयातील वातानुकूलीत यंत्राच्या दुरूस्तीचीही कामे कारागिरांना मिळतात. याशिवाय कुलरसाठी लागणारे सुटे भाग, ताटी बनविणारे कारागिर रस्त्याच्या कडेला आपले दुकान थाटतात. यातून त्यांना बऱ्यापैकी मिळकत प्राप्त होते.
उन्हाळ््यात लग्नाची धामधूम सर्वात जास्त असल्याने या काळात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते. अलिकडेच बफे संस्कृती रूजल्याने कॅटर्सना जेवणाचे कंत्राट दिले जाते. यामध्ये बेरोजगार तरूणांना रोजगार मिळत असतो. तरूण वाढण्याकरिता कॅटर्स व्यवसायात गुंतलेले असतात. या क्षेत्रात तरूणांची बऱ्यापैकी कमाई होत असते. याशिवाय शहरातील लग्न समारंभामध्ये मोठया प्रमाणात डेकोरेशन लावण्याची स्पर्धा असते. त्यामुळे डेकोरेशनच्या कामावर जाणाऱ्या तरूणांना रोजगार मिळत असतो. इव्हेन्ट मॅनेजमेंट हा प्रकार अलिकडेच वाढलेला आहे. इव्हेन्ट मॅनेज करणारी मुले सजावट, पाहुण्यांचे स्वागत, जेवणाची व्यवस्था यापासून बारिकसारिक गोष्टींची व्यवस्था पाहतात. त्यामुळे बेरोजगारांना एक नवा उद्योग उपलब्ध होत असतो.
शहरी भागात रेफ्रिजरेटरचा वापर घरोघरी केला जातो. मात्र ग्रामीण भागात माठाला मोठया प्रमाणात मागणी असते. शहरातील बहुसंख्य नागरिक माठातील पाणी पिणे पसंत करीत असल्याने उन्हाळ््यात आवर्जुन माठ खरेदी करतात. कुंभार बांधवांनी तयार केलेले माठ शेकड्याने विकत घेऊन त्यांची किरकोळ स्वरूपात विक्री करणारे तरूण शहरात रस्त्याच्या कडेला दृष्टीस पडतात. दिवसाला ४०० ते ५०० रूपयापर्यंतचा नफा बेरोजगार तरूणांना मिळत असतो. त्यामुळे उन्हाळ््यात बेरोजगार तरूणांना अनेक माध्यमातून रोजगार प्राप्त होत असते. (शहर प्रतिनिधी)