१५ दिवसांत दोन कोटींची कमाई

By Admin | Updated: November 19, 2016 00:38 IST2016-11-19T00:38:21+5:302016-11-19T00:38:21+5:30

चारही दिशांकडे ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोंदिया स्थानकाने यावर्षी दिवाळी व्हॅकेशनमध्ये चांगलीच कमाई केली आहे.

Earning two crores in 15 days | १५ दिवसांत दोन कोटींची कमाई

१५ दिवसांत दोन कोटींची कमाई

गोंदिया रेल्वे स्थानक : तिकीट विक्रीतून १.३६ कोटी तर आरक्षणातून ६३.११ लाख
देवानंद शहारे  गोंदिया
चारही दिशांकडे ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोंदिया स्थानकाने यावर्षी दिवाळी व्हॅकेशनमध्ये चांगलीच कमाई केली आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रवासाला दिलेल्या पसंतीमुळेच गोंदिया रेल्वे स्थानकाला १ ते १५ नोव्हेंबर या केवळ १५ दिवसांच्या कालावधीत बुकिंग व आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमावणे शक्य झाले आहे.
विशेष म्हणजे एरवी गोंदिया स्थानकातून दररोज जवळपास २० हजार प्रवासी रेल्वेगाड्यांत चढतात व एवढेच प्रवासी या स्थानकात उतरतात. मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळी व्हॅकेशन व इतर धार्मिक जत्रेप्रसंगी प्रवाशांच्या संख्येत चांगली वाढ होते. तसेच गोंदिया स्थानकातून चंद्रपूर, बालाघाट, रायपूर व जबलपूर या चारही दिशांकडे रेल्वेगाड्या धावत असल्याने प्रवासांना कुठेही ये-जा करणे सोयीचे ठरते. त्यामुळेही दक्षिण-पूर्व-मध्य लोहमार्गावर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत गोंदिया स्थानकातून तब्बल ३ लाख १६ हजार १९४ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. त्याद्वारे १ कोटी ९९ लाख ५७ हजार २३६ रूपयांचे उत्पन्न स्थानकाला मिळाले. यात ३ लाख ०१ हजार ५०४ प्रवाशांनी बुकिंग आॅफिसमधून तिकिटे काढून प्रवास केला, त्याद्वारे स्थानकाला १ कोटी ३६ लाख ४५ हजार ९९६ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर १४ हजार ६९० प्रवाशांनी रिझर्वेशनच्या माध्यमातून प्रवास केला, त्याद्वारे स्थानकाला ६३ लाख ११ हजार २४० रूपयांचे उत्पन्न मिळाले. दिवाळी सुट्ट्यांमध्ये सर्वच गाड्यांमध्ये गर्दी असल्याने ही कमाई झाली.

आॅक्टोबरमध्ये २.६४ कोटींचे उत्पन्न
यावर्षी दिवाळी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असल्याने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही गोंदिया रेल्वे स्थानकाला चांगलेच उत्पन्न झाले आहे. एकट्या आॅक्टोबर महिन्यात गोंदिया स्थानकावरून तब्बल ५ लाख ४१ हजार ९९२ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे २ कोटी ६४ लाख०४ हजार ६०७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात तिकिटे घेवून ५ लाख १९ हजार ५४६ प्रवाशांनी प्रवास केला, त्याद्वारे १ कोटी ८४ लाख ११ हजार ११७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर याच महिन्यात २२ हजार ४४६ प्रवाशांनी रिझर्वेशनच्या माध्यमातून प्रवास केला, त्याद्वारे ७९ लाख ९३ हजार ४९० रूपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे आॅक्टोबर व १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत एकूण ८ लाख ५८ हजार १८६ प्रवाशांनी प्रवास केला व त्याद्वारे गोंदिया स्थानकाला एकूण ४ कोटी ६३ लाख ६१ हजार ८४३ रूपयांचे उत्पन्न केवळ दीड महिन्यात मिळाले.

Web Title: Earning two crores in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.