दारूबंदी सप्ताहादरम्यान ३४ प्रकरणे दाखल

By Admin | Updated: October 8, 2014 23:27 IST2014-10-08T23:27:41+5:302014-10-08T23:27:41+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात २ आॅक्टोबरला गांधी जयंतीपासून ते ८ आॅक्टोबरपर्यंत राबविलेल्या दारूबंदी सप्ताहादरम्यान अवैध दारूविक्री, साठा, वाहतूक आणि हातभट्टीची दारू

During the liquor week, 34 cases filed | दारूबंदी सप्ताहादरम्यान ३४ प्रकरणे दाखल

दारूबंदी सप्ताहादरम्यान ३४ प्रकरणे दाखल

गोंदिया: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात २ आॅक्टोबरला गांधी जयंतीपासून ते ८ आॅक्टोबरपर्यंत राबविलेल्या दारूबंदी सप्ताहादरम्यान अवैध दारूविक्री, साठा, वाहतूक आणि हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांविरूद्ध ३४ प्रकरणे दाखल केली. यात २७ जणांना अटक करून १ लाख १९ हजार ७४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, निवडणुकीच्या काळात मद्यच्या प्रलोभनातून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रकार सुरू असतो. हे टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात गांधी जयंतीपासून एक सप्ताहभर विशेष दारूबंदी मोहीम राबविण्यात आली. या जिल्ह्यात विविध ठिकाणी ३४ कारवाया करण्यात आल्या.
गोंदियाचे निरीक्षक सुरेश डोंगरे यांच्या पथकाने ११ प्रकरणे दाखल केली. त्यात ८ आरोपींना अटक झाली. दुय्यम निरीक्षक (ग्रामीण) मंडलवार यांच्या पथकाने ४ प्रकरणे, दु.निरीक्षक (शहर) १ तसेच निरीक्षक देवरी यांनी ३ प्रकरणे, दु.निरीक्षक देवरी (क्र.१) यांनी ८, तर दु.निरीक्षक देवरी (क्र.२) यांनी ७ प्रकरणे दाखल केली आहेत.
गोंदियातील ११ पैकी ८ वारस प्रकरणांमध्ये १८० लिटर मोहा दारू, १२४० लिटर मोहा सडवा असा एकूण ३७,०९० रुपयांचा ऐवज जप्त केला. जिल्ह्यातील सर्व प्रकरणांत अटक केलेल्या आरोपींमध्ये ताराचंद दुलीचंद तिघाटे रा.गोंडीटोला, गरीबदास लटारू उके रा.सेंद्रीटोला, विनोद शिशुपाल शेंडे रा.दांडेगाव, भीमराज जरकू शेंडे रा.दांडेगाव, राजू व्यंकटराव पल्लीवार रा.दांडेगाव, कनिलाल गोमा वाढवे रा.चिचटोला, रमेश जंगलू शेंडे रा.गोंडमोहाडी, नरसैय्या परशुराम मुत्तीवार रा.धापेवाडा, लंकेश हेमचंद नागपुरे रा.चांदनीटोला, सदाराम सावंत देवाघाटी रा.भाद्याटोला, विनोद पन्नालाल उके रा.आसोली, मोतीलाल नेवारे, जितेंद्र वेलावे, औदास गजभिये, रमेश मच्छीरके, केशुलाल चक्रवर्ती आदींना अटक करण्यात आली.
ही मोहीम अधीक्षक धार्मिक यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सुरेश डोंगरे, दु.निरीक्षक निकुंभ, दु.निरीक्षक ग्रामीण मंडलवार, स.दु.निरीक्षक हुमे, जवान कांबळे, पागोटे, ढाले, देवरी विभागातील निरीक्षक गोटमारे, दु.निरीक्षक बोलधन, दु.निरीक्षक बोडेवार, स.दु.निरीक्षक रहांगडाले, ढोमणे, मुनेश्वर, वाहनचालक सोनबरसे आदींनी यशस्वी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: During the liquor week, 34 cases filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.