दुर्गेश्वरीने आत्महत्याच केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:22 IST2017-07-24T00:22:40+5:302017-07-24T00:22:40+5:30

पोलीस ठाण्यांतर्गत ढिवरटोला (सावंगी) येथील २७ वर्षीय विवाहिता दुर्गेश्वरी खनोज भगत हिने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह नदीत उडी घेवून आत्महत्या केली.

Durgeshwari committed suicide | दुर्गेश्वरीने आत्महत्याच केली

दुर्गेश्वरीने आत्महत्याच केली

उत्तरीय तपासणीत निष्पन्न : वडिलांनी केला होता हत्येचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : पोलीस ठाण्यांतर्गत ढिवरटोला (सावंगी) येथील २७ वर्षीय विवाहिता दुर्गेश्वरी खनोज भगत हिने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह नदीत उडी घेवून आत्महत्या केली. पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला, असे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.
१७ जुलै रोजी दुर्गेश्वरी खनोज भगत आणि तिचा सहा महिन्यांचा चिमुकला जितू खनोज भगत हे दोघेही नदीत वाहून गेल्याची घटना घडली होती. पाच तासांच्या शोधानंतर दोन्ही आई-लेकाचे मृतदेह वाघनदीत सापडले. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. परंतु दुर्गेश्वरीचे वडील गोर्रे येथील लोकचंद मुन्नालाल कटरे यांनी मुलीची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली, असा आरोप दुर्गेश्वरीच्या पतीसह कुुटुंबातील मंडळीवर लावला होता.
त्यानुसार पोलिसांनी तपास कार्य सुरू ठेवले होते. २१ जुलैला उत्तरीय तपासणी अहवाल ग्रामीण रूग्णालयाने दिला.
त्यानुसार दुर्गेश्वरीने आपल्या मुलासह नदीत उडी मारुन आत्महत्या केली. १८ जुलैला पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढली होती. त्यामुळे ते दोघे काही अंतरापर्यंत वाहून गेले होते.

 

Web Title: Durgeshwari committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.