मामा तलावात मॉईलचे डम्पींग यार्ड
By Admin | Updated: April 23, 2015 00:38 IST2015-04-23T00:38:01+5:302015-04-23T00:38:01+5:30
पिण्याचे पाणी तथा शेती सिंचनाकरिता उपयोगी मामा तलावात मॉईल प्रशासनाने मॅग्नीज डम्पींग यार्ड तयार केले आहे.

मामा तलावात मॉईलचे डम्पींग यार्ड
प्रशासनाची चुप्पी : डोंगरी येथील प्रकार
तुमसर : पिण्याचे पाणी तथा शेती सिंचनाकरिता उपयोगी मामा तलावात मॉईल प्रशासनाने मॅग्नीज डम्पींग यार्ड तयार केले आहे. डोंगरी बु. येथे जिल्हा परिषदेअंतर्गत लघु पाटबंधारे विभागांतर्गत हे मामा तलाव येतात. याप्रकरणात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मूग गिळून आहे.
तलाठी साझा क्रमांक १८५, १८६, १८२, १८३ व १८४ मध्ये मामा तलाव आहे हे तलाव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत करण्यात आले. मॉईल प्रशासनाने या तलावात मॅग्नीज डम्पींग यार्ड तयार केले. यामुळे मामा तलावाचे अस्तित्वच संपले आहे.
मॉईल प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायत तथा जिल्हा परिषदेच्या मामा तलावाचा उपयोग डम्पीग यार्ड करीता करण्याची परवानगी घेतली नाही. ग्रामपंचायत जमिनीवर आतापर्यंत मॉईल प्रशासनाने डल्ला मारला आहे. डम्पींग यार्ड लोकवस्तीपर्यंत आल्याने काही ग्रामस्थांनी पलायन केले आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ या परिसराचा सर्व्हे करण्याची गरज आहे. प्रकरणाची दखल घेऊन केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
मॉईल प्रशासनात पारदर्शीपणा असून जागेतच मॉईल डम्पींग करीत आहे. शेतकऱ्यांच्या जागा नियमानुसार खरेदी करण्यात आल्या आहेत. अधिकारी वर्गाना केंद्र शासनाला जबाब द्यावा लागतो. नियमबाहय कामे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- किशोर चंदाकार
मॉईल प्रतिनिधी डोंगरी, चिखला,