रेती-मुरूम व्यावसायिकांना दणका

By Admin | Updated: July 22, 2016 02:35 IST2016-07-22T02:35:12+5:302016-07-22T02:35:12+5:30

तालुक्यात रेती व मुरुमाचा व्यवसाय करताना नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ....

Dump to the sand-mooring professionals | रेती-मुरूम व्यावसायिकांना दणका

रेती-मुरूम व्यावसायिकांना दणका

नियमाप्रमाणे दंड आकारणार : तहसीलदारांच्या धाकाने उभे केले ट्रॅक्टर
आमगाव : तालुक्यात रेती व मुरुमाचा व्यवसाय करताना नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आणि नियमाप्रमाणे दंड आकारणी केली जाईल, अशी ठाम भूमिका तहसीलदार साहेबराव राठोड यांनी घेतली आहे. त्यांची ही भूमिका नियमबाह्यव्यवसाय करणाऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे रेती, मुरुमाचा व्यवसाय करणाऱ्यांनी आपले २१ ट्रॅक्टर तहसील कार्यालयासमोर उभे केले आहेत.
तहसीलदार राठोड यांनी यासंदर्भात सांगितले की, जो अवैधपणे मुरुमाची वाहतूक करतो त्यांच्याकडून १० हजार ८०० रुयये दंड व रेती अवैध नेली जाते त्यांच्याकडून ७ हजार ८०० ते ३२ हजार किंवा त्यापेक्षाही जास्त दंड वसूूल केला जाणार आहे. चोरी गेलेल्या अवैध गौण खनिजांची मौका तपासणी व वास्तविकता पाहून जास्त सुद्धा आकारणी केली जाईल. हा सर्व महसूल शासनजमा केला जाणार आहे.
यावर ट्रॅक्टर मालकांशी चर्चा केली असता अगोदर अवैध रेती, मुरुम व्यवसाय करणाऱ्यांवर ५ हजार ४०० रुपये दंड वसूल केला जात होता. तीच कारवाई आता होणे गरजेचे आहे, असे ट्रॅक्टर मालकांचे मत आहे. त्यांच्या मते होणारी ही कारवाई व दंड जास्त प्रमाणात असल्याने त्याचा निषेध म्हणून ट्रॅक्टर तहसील कार्यालयाजवळ उभे करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करुन मुरुम चोरुन नेणाऱ्यावर १० हजार ८०० व रेती चोरणाऱ्यावर ७ हजार ८०० ते ३२ हजार किंवा त्यापेक्षा जास्त दंड आकारण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Dump to the sand-mooring professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.