रेती वाहक ट्रकमुळे डोळ्याचे आजार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:06 IST2018-02-27T00:06:14+5:302018-02-27T00:06:14+5:30
तालुक्यात रेती घाटावरुन रेती उचल करुन ट्रकद्वारे रेतीची वाहतूक केली जात असताना पुरेशी काळजी घेतल्या जात नाही. रेती ट्रकमध्ये पूर्णपणे भरली जाते.

रेती वाहक ट्रकमुळे डोळ्याचे आजार वाढले
आॅनलाईन लोकमत
तिरोडा : तालुक्यात रेती घाटावरुन रेती उचल करुन ट्रकद्वारे रेतीची वाहतूक केली जात असताना पुरेशी काळजी घेतल्या जात नाही. रेती ट्रकमध्ये पूर्णपणे भरली जाते. आवश्यकतेपेक्षा जास्त रेती भरल्याने व त्यावर काहीही झाकले जात नसल्याने दुचाकी स्वार आणि रस्त्यावरुन ये-जा करणाºयांच्या डोळ्यात जाते. डोळ्याच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कित्येकदा यामुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पोलीस विभागही याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.
ट्रकमध्ये रेती उंच भागापर्यंत भरली जाते. सोमवारी (दि.२६) सुलताना नाव असलेला एक विना क्रमाकांचा ट्रक तिरोड्याकडून साकोली मार्गे जात होता. यात देखील ट्रालीच्या वरील भागापर्यंत रेती भरुन वाहतुक केली जात होती. तर लाखेगाव , बोपेसर, सातोना, वडेगाव या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतुक करणाºया ट्रकची वर्दळ असते. यापैकी बºयाच ट्रकवर क्रमांक सुध्दा नसतात. त्यामुळे एखादा अपघात घडल्यास तक्रार कशी करायची असा सुध्दा प्रश्न निर्माण होतो. हा सर्व गंभीर प्रकार सर्रासपणे सुरू असून महसूल आणि पोलिस विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.