डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा जीव धोक्यात

By Admin | Updated: May 28, 2016 01:53 IST2016-05-28T01:53:26+5:302016-05-28T01:53:26+5:30

बारा वर्षीय मुलगा राम अण्णा चौधरी कंप्यूटर क्लॉस करून आपल्या घरी परत जात होता. दरम्यान एका कुत्राने त्याच्यावर हल्ला करून जखमी केले.

Due to negligence of the child, the child's life threatens | डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा जीव धोक्यात

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा जीव धोक्यात

कुत्र्याचा चावा : टीटी व रॅबिजऐवजी दिली जेन्टामायसिनची लस
गोंदिया : बारा वर्षीय मुलगा राम अण्णा चौधरी कंप्यूटर क्लॉस करून आपल्या घरी परत जात होता. दरम्यान एका कुत्राने त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. त्याला उपचारासाठी त्वरित दवनीवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील अक्षय चौधरी नामक मुलाने वैद्यकीय अधिकारी डॉ. के.ए. खरवडे यांच्याकडे नेले. तेथे डॉ. खरवडे यांनी रॅबिज व टीटीनसची लस न देता जेन्टामायसिन (जीएम) लावण्याचा आदेश दिला. त्यामुळे सदर बालकाचे जीव धोक्यात आले आहे.
ही घटना २४ मे रोजी दवनीवाडा ये घडली. त्यावेळी रामचे वडील घरी नसल्याने सदर प्रकरणाची त्यांना माहिती नव्हती. २६ मे रोजी ते घरी परतल्यावर त्यांनी डॉ. खरवडे यांच्याशी चर्चा केली. कुत्र्याने नखे ओरबाडल्यावर आपण टीटी व रॅबिजची लस न लावता जेन्टामायसिन हे वाळण्याचे लस दिल्याचे म्हटले. मात्र डॉ. खरवडे यांनी मला अधिक कळते की तुम्हाला अधिक समजते, असे उत्तर दिले. यावर रामच्या वडिलांनी दुसऱ्या डॉक्टरांशी याबाबत चर्चा केल्याचे सांगितले. मात्र डॉ. खरवडे यांनी जेन्टामायसिन लस लावायची असेल तर लावा, अन्यथा घरी जा, असे उद्धटपणे बोलले.
याबाबत मुलाच्या वडिलांनी आ. विजय रहांगडाले यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना घटनेची माहिती देवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सरपंच तिजा मस्करे यांनीही डॉ. खरवडे यांना कुत्र्याची घटना असताना टीटी किंवा रॅबिजची लस का लावली नाही, अशी विचारणा केली. मात्र डॉ. खरवडे यांनी, मला जे करायचे होते, तेच मी केले, असे उत्तर दिले. या प्रकारामुळे शुक्रवार (दि.२७) सकाळी ११ वाजता राम चौधरीला भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉ. व्ही.एन. चौरागडे यांनी त्वरित टीटी व रॅबिजची लस लावण्याचे आदेश दिले.

Web Title: Due to negligence of the child, the child's life threatens