कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे देना बँकेचे व्यवहार ठप्प
By Admin | Updated: November 12, 2014 22:46 IST2014-11-12T22:46:57+5:302014-11-12T22:46:57+5:30
शहरात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली देना बँकेत आज कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पैशाची देवाण घेवाण पुर्णत: बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे देना बँकेचे व्यवहार ठप्प
देवरी : शहरात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली देना बँकेत आज कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पैशाची देवाण घेवाण पुर्णत: बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोक बऱ्याच संख्येत ११ वाजता पैशाचे व्यवहार करण्याकरीता बँकेत पोहोचले. परंतु बँकेतील मुख्य कर्मचारी, उपलेखापाल व व्यवस्थापक गैरहजर असल्याने विड्रॉल फार्मवर कोण स्वाक्षरी करणार? हा प्रश्न तेथील उपस्थित रोख व लिपीक पडला त्यामुळे त्यांनी ग्राहकांना सांगितले की, आज पैशाचे व्यवहार होणार नाही. हे ऐकताच ग्राहकांची तारांबळ उडाली. त्यांनी संताप व्यक्त करीत बँकेतुन खाली हात परतले.
प्राप्त माहितीनुसार मागील २० दिवसांपासून बँकेचे व्यवस्थापक सुधाकर नाना रंगारी बेपत्ता होते. तसेच उप लेखापाल महिला कर्मचारी सुट्टीवर आहेत. अशावेळी बँक व्यवस्थापकाद्वारे दुसरी कोणतीच उपाययोजना न केल्याने आज ग्राहकांना खाली हाताने परतावे लागले.
विशेष म्हणजे या बँकेत सामान्य नागरिकांव्यतिरिक्त व्यापारी वर्ग निराधार वृद्ध, महिला, घरकुल योजना व मनरेगाचे हजारो खाते असल्याने दररोज या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बँकेची इमारत छोटी असल्यामुळे बरेचदा ग्राहकांना बँकेच्या बाहेर उन्हात उभे राहावे लागते. एटीएम मशीन शोभेची वास्तू बनवून ठेवण्यात आली आहे. सुरक्षा कर्मी व पार्किंगची सुविधा नाही. या संगळ्या अव्यवस्थेत बँकेत व्यवस्थापक नसने ही ग्राहकांसाठी चितेंची बाब आहे. देना बँकेच्या उच्च अधिकाराऱ्यांच्या दुर्लक्षामुळे देना बँकेच्या देवरी शाखेचे भविष्य संकटात असल्याचे बोलल्या जात आहे. देना बँकेच्या वरिष्ट स्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)