सामूहिक विवाहाची कास धरावी

By Admin | Updated: May 7, 2015 00:33 IST2015-05-07T00:33:40+5:302015-05-07T00:33:40+5:30

पैशाचा अपव्यय टाळणे व वेळेची बचत करणे हे काम सामूहिक विवाहातून हावू शकते. प्रत्येक समाजाने आर्थिक उन्नती ....

Due to collective marriage | सामूहिक विवाहाची कास धरावी

सामूहिक विवाहाची कास धरावी

आमगाव : पैशाचा अपव्यय टाळणे व वेळेची बचत करणे हे काम सामूहिक विवाहातून हावू शकते. प्रत्येक समाजाने आर्थिक उन्नती करण्यासाठी आपापल्या पाल्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करुन लग्ना निमित्त होणार खर्च टाळावा, असे आवाहन तिरोडाचे माजी आमदार दिलीप बंसोड यांनी काढले.
कुणबी समाज सेवा समिती आमगाव तर्फे संत तुकाराम महाराज कुणबी समाज भवन पंचायत समिती रोड आमगाव येथे आयोजित कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष तथा समितीचे अध्यक्ष विजय शिवणकर, प्रितम गायधने, बुधराम चेटे, टीकाराम मेंढे, कमलबापू बहेकार, संगीता दोनोडे, उषा हर्षे, धनीराम मटाले, पद्मा चुटे, जगमोहन पाथोडे, राजकुमार फुंडे, सिताराम फुंडे, महेश माहेश्वरी, बाबूलाल दोनोडे, मार्कंडराव ब्राह्मणकर, उषा मेंढे, सविता पुराम, सुखराम फुंडे, हुकुमंच बहेकार, संपत्त सोनी, रविशंकर हत्तीमारे उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
यावेळी १३ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा घडवून आनला. मंगलाष्टके नारायण बहेकार, जगदिश चुटे यांनी सादर केले. या विवाह सोहळ्यातील वर-वधूंना समितीतर्फे भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र येटरे तर आभार प्रा. उमेश मेंढे यांनी मानले. वरांसाठी जाणवसा आमगाव ग्रा. पं. येथे ठेवला होता. नाचत-गाजत वरात कुणबी समाज भवनात आणण्यात आली. या विवाह सोहळ्याला २५ हजार समाज बांधवांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनलाल मेंढे, काशिराम शिवणकर, कृष्णा कोरे, दीपक मेंढे, सी.जी. पाऊलझगडे, राजेश शिवणकर, तिरथ येटरे, नरेश रहिले, राजू फुंंडे, बाळू शिवणकर, बी.एम. भुसारी, परसराम फुंडे, गिरधारी शिवणकर, मदन बहेकार, काशिराम हुपरे, छाटू बहेकार, हेमंत फुंडे, जगमोहन पाथोडे, डॉ. शशांक डोये, के.डी. ब्राह्मणकर, ए.एस. बहेकार, शामराव बहेकार, किशन धार्मिक, गोपाल तावाडे, नामदेव बोहरे, प्रकाश बोहरे, अरुण बोहरे, शंकर पाथोडे, धरम पाथोडे, गणू मेंढे, भोजराज चुटे, रिधीराम मेंढे, राधेश्याम महारवाडे, मोतीराम चुटे, छन्नू शेंडे, किशोरदास फुंडे, सेवकराम ब्राह्मणकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to collective marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.