ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: December 13, 2015 01:59 IST2015-12-13T01:59:25+5:302015-12-13T01:59:25+5:30

निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले.

Due to the cloudy environment, the incidence of diseases of various diseases | ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

शेतकरी चिंताग्रस्त : कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत नाही
रावणवाडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले. चिंतातूर शेतकऱ्यांचा आशेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना आतापासूनच सतावत आहे.
यावर्षी धानाचा उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. तूरीचे पिक हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तेही हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशात वर्षभराचा कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा वेळेवर आलेले प्रासंगीक खर्च करायचे कसे याची काळजी शेतकऱ्यांना आतापासूनच सतावू लागली आहे. परिसरातील शेतपिकाची एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. शेतकऱ्यांचा शेतापर्यंत पोहचण्याची तसदी घेत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा दुहेरी संकटात सापडण्याची चिन्हे आता पासूनच दिसत आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाने बऱ्याच काळापर्यंत दही आणि आवश्यकतेच्या वेळी पावसाची माघारमुळे धानाचे नगदी पिक हातून गेले ऐनवेळी पावसाची गरज असताना त्यावेळी पाऊस बरसला नाही. त्यामुळे तूर पिकाचे उत्पन्न हाती येईलच अशी मनस्थिती शेतकऱ्याची होती. त्यातून कुटूंबाचा निर्वाह होईल मात्र उलटच होऊन नियमित ढगाळ वातावरणामुळे पिकावर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यास्थितीत काय उपाय योजना करायला पाहिजे. त्याबद्दल शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नाही. शेतकरी संकटात सापडले असताना त्यांना साधे मार्गदर्शन कृषी कार्यालयाकडून होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to the cloudy environment, the incidence of diseases of various diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.