बँकेच्या कार्यपद्धतीमुळे शेतकरी ग्राहक झाले त्रस्त
By Admin | Updated: October 26, 2016 02:36 IST2016-10-26T02:36:01+5:302016-10-26T02:36:01+5:30
परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची एकही शाखा नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार

बँकेच्या कार्यपद्धतीमुळे शेतकरी ग्राहक झाले त्रस्त
को-आॅपरेटिव्ह बँकेची लिंक फेल : ग्राहकांची होताहे कुचंबना
रावणवाडी : परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची एकही शाखा नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी एकमेव ही एकच शाखा असल्यामुळे दैनंदिन देणाव-घेवाण याच बँकेतून करून घेणे माग पडत आहे. मात्र या शाखेतील लिंक सतत फेल होत असल्यामुळे बँक खाते धारकांची कुचंबना होत आहे. मात्र संबंधित बँकेचे वरिष्ठ अधिकारी निष्क्रीय झाल्याचे दिसून येत आहेत.
ग्राहकांच्या सेवेसाठी सहकार माध्यमातून बँकेची स्थापना गावात करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना, पेंशन धारकांना, देयकाचा भरणा करणाऱ्यांना, कृषी आधारित देवाण-घेवाण करणाऱ्या ग्राहकांना तासनतास बँक शाखेत आपल्या कामानिमित्त ताटकळत रहावे लागत असून त्याच कामासाठी पुन्हा बँकेत यावे लागत असते. मात्र शाखा व्यवस्थापनाकडून लिंक फेल झाले असल्याचे फर्मान ग्राहकांना सुनावण्यात येत आहे. शाखेत ग्राहकांच्या एकही कामाचा निपटारा वेळेवर होत नसल्यामुळे बँकेत ग्राहक बैजार झाले आहेत.
बँक शाखेचे लिंक फेल होण्याचा आजार एक ते दिन महिण्यांपासून सुरू झाले आहे. मात्र बँकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रकाराचे गांभीर्य लक्षात न घेता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे दूरवरच्या गावावरून येणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय ग्राहकांना बँकेच्या कामानिमित्त अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांना या ग्राहकांना होणाऱ्या त्रासाचे काहीच देणे घेणे नसल्यासारखेच दिसून येत आहे. (वार्ताहर)