शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जनजागृतीमुळे हत्तीरोगावर बसू लागलाय आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM

हत्तीरोग हा आजार वुचेरेरिया बॅक्रोटी या परोपजीवी जंतूमुळे होतो. या जंतूचा प्रसार क्युलेक्स जातीच्या मादी डासामार्फत होत असतो. हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरिया) हे मादी डासामार्फत त्वचेवर सोडले जाते. त्यानंतर जंतू स्वत: ५ जखम छिद्र शोधून आत शिरण्याचे काम करतात. दूषीत डास वारंवार चावल्यावर काही व्यक्तींनाच हत्तीरोग या आजाराची लागण होते.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये २०६७ रुग्ण : ४५८ रूग्ण कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हत्तीरोग हा एक अत्यंत त्रासदायक आजार आहे. या आजाराने रूग्ण दगावत नसला तरी त्याला अत्यधिक शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा आजार बरा होत नसल्याने रूग्णांची त्यातून सुटका होत नाही. आरोग्य विभागाच्यावतीने १६ ते ३१ आॅगस्ट २०१९ या वेळेत हत्तीरोग रुग्णांची तपासणी मोहीम चालविण्यात आली. यात दोन हजार ६७ रुग्ण आढळून आले. रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने आता २ मार्चपासून सामूहिक औषधोपचार मोहीम (एमडीए) चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय हत्तीरोग नियंत्रणासाठी ब्रम्हास्त्र ठरत आहे.ग्रामीण भागात २ ते ७ मार्च, शहरी क्षेत्रात २ ते १२ मार्च पर्यंत सामूहिक ओषधौपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरम्यान आरोग्य कर्मचारी व आशा सेविका घराघरात जावून हत्तीरोग नियंत्रण औषधीचे डोज देणार आहेत. मोहिमेला यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सन २०१९ या वर्षात हत्तीरोग रुग्ण तपासणी अभियानात गोंदिया तालुक्यात ३५१, तिरोडा २६९, गोरेगाव २७६, आमगाव १३९, देवरी १३९, सालेकसा ६४, अर्जुनी-मोरगाव ४८० व सडक-अर्जुनी तालुक्यात ३४३ अशा प्रकारे दोन हजार ६७ रुग्ण आढळले होते. डॉ. चौरागडे यांनी सांगितले की, डासांच्या चावल्यामुळे हत्तीरोगाचे लक्षण दिसून येत नाही. परंतु डासांच्या माध्यमातून जंतू शरीरात गेल्यावर याची लक्षणे दिसतात. यात ६ ते १८ महिन्यांचा कालावधी लागतो. हत्तीरोग नियंत्रण करिता आरोग्य विभाग नागरिकांच्या घरापर्यंत जावून गोळ्या वितरित करीत आहेत. सांगण्यात येते की आरोग्य कर्मचारी नागरिकांना हत्तीरोगवर मार्गदर्शन करून नागरिकांना गोळ्या सेवन करायला लावणार आहे.हत्तीरोग होण्याची ही आहेत कारणेहत्तीरोग हा आजार वुचेरेरिया बॅक्रोटी या परोपजीवी जंतूमुळे होतो. या जंतूचा प्रसार क्युलेक्स जातीच्या मादी डासामार्फत होत असतो. हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरिया) हे मादी डासामार्फत त्वचेवर सोडले जाते. त्यानंतर जंतू स्वत: ५ जखम छिद्र शोधून आत शिरण्याचे काम करतात. दूषीत डास वारंवार चावल्यावर काही व्यक्तींनाच हत्तीरोग या आजाराची लागण होते. मादी जंतू लाखो लहान जंतूंना जन्म देते. ते रात्रीच्यावेळी रूग्णाच्या रक्तप्रवाहात फिरतात आणि नंतर डास चावल्याने दुसºया व्यक्तीकडे प्रसारीत होते.या करा उपाययोजनाडासांची संख्या कमी करणे, घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, घाण व कचºयाची विल्हेवाट लावावी, सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, घराभोवती कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, घरातील सर्व भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करावीत, एक दिवस चांगले उन्हात वाळवावे, पाणी साठवलेली भांडी योग्य झाकून ठेवावीत, फुलदान्या, झाडांच्या कुंड्यातील पाणी व कुलरमधील पाणी नियमित बदलावे तसेच मच्छरदाण्यांचा वापर करावा.

टॅग्स :Healthआरोग्य