दांडियावर थिरकली तरूणाई
By Admin | Updated: October 21, 2015 01:49 IST2015-10-21T01:49:24+5:302015-10-21T01:49:24+5:30
लोकमत इन्व्हेंट व श्री रास गरबा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय धमाल दांडिया स्पर्धेचे आयोजन ...

दांडियावर थिरकली तरूणाई
गोंदिया : लोकमत इन्व्हेंट व श्री रास गरबा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय धमाल दांडिया स्पर्धेचे आयोजन स्थानिक श्री रास गरबा उत्सव समितीच्या मैदानावर करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महाआरती व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, प्रमुख अतिथीे म्हणून वॉटर सर्व्हिसेसचे संचालक प्रकाश शर्मा, सविता अग्रवाल, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, नगरसेविका भावना कदम, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, नगरसेविका श्रध्दा अग्रवाल, लोकमत जिल्हा इन्व्हेंट प्रमुख दिव्या भगत, श्रीकांत पिल्लेवार उपस्थित होते.
उद्घाटनीय भाषणात खा. नाना पटोले यांनी म्हणाले की, लोकमत वृत्तपत्र समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारां एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी गोंदिया सांस्कृतिक क्षेत्रात मागासलेला असून इतल्या कलाकारांना एक मंच मिळत नाही. ते हक्काचे व्यासपीठ लोकमतने त्यांना उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धक जिंकून राज्यस्तरीय धमाल दांडिया या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. स्पर्धेत एकूण ८ चमू सहभागी झाल्या होत्या. त्यात युनिक ग्रुप गोंदिया, स्टार ग्रुप सडक-अर्जुनी, सिना ग्रुप गोंदिया, नटवर ग्रुप तिरोडा, संयुक्त फ्रेंडस तिरोडा, श्रध्दा सबुरी तिरोडा, याराना ग्रुप तिरोडा इतर चमू सहभागी झाल्या होत्या. सर्व स्पर्धकांनी उत्तम दांडिया नृत्य करून गोंदियाकरांची मने जिंकली. स्पर्धेत बेटी बचाओ, रक्तदान, नेत्रदान, रस्ता सुरक्षा, मतदान, हुंडा पध्दती असे सामाजिक विषय घेऊन स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रध्दा सबुरी ग्रुप तिरोडा यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक स्टार ग्रुप सडक-अर्जुनी तर तृतीय याराना ग्रुप तिरोडा यांनी पटकाविला. स्पर्धेत विजेती श्रध्दा सबुरी चमू ही राज्यस्तरीय धमाल दांडिया या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कार्यक्रमाला संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण दांडिया कोरियोग्राफर कुश माटे, जीनाईन ग्रुप डांस अॅकादमीचे संचालक राहुल बघेले यांनी केले. सर्व सहभागी झालेल्या व विजेत्या चमूला स्पर्धकांनी तसेच परीक्षकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संचालन दिलीप कोसरे, प्रास्ताविक दिव्या भगत यांनी तर आभार श्रीकांत पिल्लेवार यांनी केले.
यशस्वीतेसाठी श्रध्दा सबुरी रास गरबा समितीचे अध्यक्ष कुशल अग्रवाल, सचिव राजेश लांजेवार, सुजाता बाहेकार, राजेंद्र कावळे, विपुल अग्रवाल, दर्पण वानखेडे, लकी भोयर, विशु डोंगरे व समितीच्या कार्यकर्त्यानी सहकार्य केले. प्रास्ताविक दिव्या भगत यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)