शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

रेल्वे गाडीतून दारूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:20 IST

कॉलेज बॅगमध्ये दारूच्या बॉटल भरून त्याची रेल्वे गाडीतून वाहतूक करीत असलेल्या तिघांना रेल्वेच्या टास्क टीमने रंगेहात पकडले. शनिवारी (दि.१८) रात्री गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत (७८८२०) ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देतिघांना पकडले : गोंदिया-बल्लारशाह डेमोतील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कॉलेज बॅगमध्ये दारूच्या बॉटल भरून त्याची रेल्वे गाडीतून वाहतूक करीत असलेल्या तिघांना रेल्वेच्या टास्क टीमने रंगेहात पकडले. शनिवारी (दि.१८) रात्री गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत (७८८२०) ही कारवाई करण्यात आली. तिघांना अटक करून त्यांच्याकडील नऊ हजार ७२४ किमतीची दारू जप्त करण्यात आली.चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुची तस्करी केली जाते. यासाठी दारुची तस्करी करणारे वेगवेगळे मार्ग अवलंबित आहे. दारुची तस्करी करणाऱ्यांनी आता आपली नजर रेल्वे गाड्यांकडे वळविली आहे. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे गाडीतून सामानाच्या टोपली व कॉलेजबॅगमधून दारुची तस्करी करीत असल्याच्या घटना सुध्दा यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. दरम्यान रेल्वे पोलिसांनी या गाड्यांमधील गस्त वाढविली असून दारुची तस्करी करणाºयावर बारीक नजर ठेवली आहे. स्पेशल टास्क टीमचे उप निरीक्षक विवेक मेश्राम, प्रधान आरक्षक जी. आर. मडावी, आरक्षक पी.एल.पटेल, गुन्हे शाखेचे उप निरीक्षक एस.एस.बघेल, प्रधान आरक्षक आर.सी.कटरे शनिवारी (दि.१८) गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत नजर ठेवून होते. दुपारी १२ वाजतादरम्यान अर्जुनी रेल्वे स्थानकावर त्यांना तिघेजण वजनदार कॉलेज बॅग घेऊन संशयीत अवस्थेत गाडीत चढताना आढळले. यावर टीमने तिघांना पकडून त्यांची नावे विचारली असता त्यांनी रमेश गजानन खोब्रागडे (४०,रा.खरपुंडी बोरिंग,गडचिरोली), नितेश उर्फ बाल्या कवडू गेडाम (३२,रा.ढिमर मोहल्ला, गडचिरोली) व संतोष उर्फ गुड्डू नानाजी भोयर (३१, ढिमर मोहल्ला, गडचिरोली) असे सांगीतले. टीममधील कर्मचाºयांनी विचारपूस केली असता तिघांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. यात रमेश खोब्रागडे याच्याकडील दोन बॅग व एका थैलीत देशी दारूच्या ९० मिलीच्या १८८ बॉटल्स, नितेश गेडामकडील बॅगमधून देशी दारूच्या ९० मिलीच्या ९७ बॉटल्स तर संतोष भोयरकडील बॅगमधून देशी दारूच्या ९० मिलीच्या ८९ बॉटल्स सापडल्या. दरम्यान, या तिघांची उलट तपासणी केली असता त्यांनी अर्जुनी-मोरगाव येथून दारू खरेदी करून गडचिरोली येथे अवैध व्यापार करीत असल्याचे सांगीतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अर्जुनी ते वडसापर्यंतचे रेल्वेचे तिकीट आढळले. मात्र दारूची वाहतूक करण्यासाठी कोणतेही अधिकार पत्र मिळाले नाही. यावर टीमने तिघांना ताब्यात घेत वडसा येथून गोंदियाला आणले. तसेच त्यांच्याकडील एकूण नऊ हजार ७२४ रूपये किमतीच्या देशी दारूच्या ३७४ बॉटल्स पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलिसांच्या सुपूर्द केले.

टॅग्स :liquor banदारूबंदीrailwayरेल्वे