बाहेर राज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची ड्रोनव्दारे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:26+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे, बांधकाम सर्व बंद पडल्याने बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर, कामगार आपल्या राज्यात व गावाकडे परतत आहे. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Drones look at the police coming from outside the state | बाहेर राज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची ड्रोनव्दारे नजर

बाहेर राज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची ड्रोनव्दारे नजर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी : कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे युध्दपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी पोलीस विभागाव्दारे ड्रोनव्दारे नजर ठेवली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे, बांधकाम सर्व बंद पडल्याने बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर, कामगार आपल्या राज्यात व गावाकडे परतत आहे. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे सुध्दा उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे ड्रोनची मदत घेण्यात आली आहे. शहर परिसरात ३, तिरोडा १, देवरी १, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, रावणवाडी परिसरात प्रत्येकी एका ड्रोनव्दार नजर ठेवण्यात आली आहे. तसेच या माध्यमातून गर्दीवर सुध्दा नियंत्रण ठेवले जात आहे.
किराणा दुकान, भाजीबाजार, मेडिकल या परिसरात होणाºया गर्दीवर सुध्दा ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातील सर्व आंतरराज्यीय आणि जिल्ह्याची सीमा पूर्णत: बंद करण्यात आली आहे. जवळपास ५० ते ६० ठिकाणी नाकाबंदी करुन बाहेरुन येणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. तसेच विनाकारण बाहेर पडणाºयांवर सुध्दा कारवाई केली जात आहे.

मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्याची सोय
जिल्ह्यातील विविध भागातील मजूर इतर राज्यात रोजगारासाठी गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे आता ते आपल्या गावाकडे पोहचत आहेत. वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने हे सर्व मजूर रेल्वे मार्गाने पायीच येत आहे. अशा पायी येणाºया मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्याची सोय देखील पोलीस विभागाकडून केली जात आहे. तर परराज्यातील मजुरांवर सुध्दा नजर ठेवली जात असून त्यांना आश्रयस्थळांपर्यत पोहचवून त्यांची राहण्याची आणि भोजनाची सोय पोलिसांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असल्याने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, घरातच राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करावी.
- मंगेश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया.

Web Title: Drones look at the police coming from outside the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.