तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:36+5:302021-07-31T04:29:36+5:30

हवामान विभागाने यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता; मात्र हा अंदाज जिल्ह्यात वारंवार खोटा ठरला आहे. त्यामुळे हवामान विभागावरील ...

The drizzle continued for three days | तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम

तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम

हवामान विभागाने यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता; मात्र हा अंदाज जिल्ह्यात वारंवार खोटा ठरला आहे. त्यामुळे हवामान विभागावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. पावसाअभावी यंदा रोवणी पंधरा दिवस उशिरा सुरू झाली. तर जिल्ह्यातील मोठ्या धरणामध्येसुद्धा ३० ते ३५ तर मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाने पुढे दगा दिल्यास समस्या गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असली तरी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फारसा फायदेशिर नाही. मागील २४ तासात ११.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढत नसल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या अद्यापही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची काहीशी चिंता कायम आहे.

................

Web Title: The drizzle continued for three days