नाटक हे प्रबोधनाचे माध्यम
By Admin | Updated: November 2, 2014 22:38 IST2014-11-02T22:38:55+5:302014-11-02T22:38:55+5:30
चित्रपटांची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामीण भागात गोंधळ, तमाशा, दंडार इत्यादी लोककलांसोबतच नाटकसुध्दा मनोरंजनाचे साधन होते. एवढेच नाही तर कौटुंबिक, सामाजिक व धार्मिक

नाटक हे प्रबोधनाचे माध्यम
साखरीटोला : चित्रपटांची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामीण भागात गोंधळ, तमाशा, दंडार इत्यादी लोककलांसोबतच नाटकसुध्दा मनोरंजनाचे साधन होते. एवढेच नाही तर कौटुंबिक, सामाजिक व धार्मिक नाटकांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले जात होते. आताही इंटरनेटच्या काळात ग्रामीण भागात प्रबोधनाचे महत्वाचे माध्यम म्हणून नाटकाला महत्व आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सविता पुराम यांनी कवडी येथे ‘दहशत’ या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
खास मंडईनिमित्त परिवर्तन नाट्य कला मंडळाच्या वतीने ३० आॅक्टोबर रोजी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन सविता पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस.आर. रहांगडाले तर रंगमंच म्हणून पूजक वि.आर. सिरसाठ, सरपंच नोहरलाल चौधरी,डॉ. संजय देशमुख, रमेश चुटे, डॉ. अजय उमाटे, प्राचार्य सागर काटेखाये, तंमुस अध्यक्ष नारायण डोंगरे, डॉ. भुवन लांजेवार, डॉ. अनिश अग्रवाल, किशोर रहांगडाले, पोलीस पाटील विलास साखरे, मोहनसिंग बघेल, पंचायत समिती सदस्य संगीता शहारे, छाया रहांगडाले, ममता रहांगडाले, मुकेश नागेंद्र, किसन चकोले, देवराव चुटे, मनोज शरणागत, गुड्डु बिसेन, उपसरपंच सुरजलाल चौधरी, सचिन हेमने उपस्थित होते.
तुही दाता, तुही विधाता, मंगलमूर्ती मोरया या धार्मिक गीताने नाटकाला प्रारंभ करण्यात आला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला राजकीय पुढाऱ्यांच्या अत्याचाराला कशाप्रकारे बळी पडावे लागते याची कौटुंबिक कथा दहशत नाटकातून प्रगट करण्यात आली. शेखर पटले सारख्या कसलेल्या कलाकारामुळे नाटकाव्दारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले.
कार्यक्रमाचे संचालन कमलेश बोपचे यांनी केले. नाटकाचे यशस्वी आयोजनासाठी सुभाष खैरे, देवदास टेंभुर्णीकर, संतोष साखरे, महेंद्र चौधरी, प्यारेलाल चौधरी, महेंद्र कटरे, अनिल बिसेन, अमृतलाल बिसेन, वैभव वालदे तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)