अरूंद रॅम्पमुळे प्रवाशांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:39 IST2017-11-26T21:38:17+5:302017-11-26T21:39:12+5:30
येथील रेल्वे स्थानकाच्या विकासात दरवर्षी भर पडत आहे. परंतु नवीन फलाटांवर तयार करण्यात आलेले रॅम्प अरूंद असल्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण होत आहे.

अरूंद रॅम्पमुळे प्रवाशांना मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकाच्या विकासात दरवर्षी भर पडत आहे. परंतु नवीन फलाटांवर तयार करण्यात आलेले रॅम्प अरूंद असल्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण होत आहे. शिवाय फूट ओव्हर ब्रिजसुद्धा अरूंदच तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे नियमांचे उल्लंघन करून रॅम्पवरून न जाता लोहमार्ग ओलांडून जातात. हे प्रकार अपघाताला आमंत्र देणारे ठरत आहेत.
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ व ६ वर अत्यंत अरूंद रॅम्प आहे. केवळ दोन-तीन वर्षांपूर्वीच सदर रॅम्प तयार करण्यात आले. हे रॅम्पसुद्धा धोकादायक ठरू लागले आहे. या प्लॅटफॉर्मवरून विदर्भ व महाराष्टÑ एक्स्प्रेस सुटतात व येतात. याशिवाय बालाघाटच्या दिशेने ये-जा करणाºया गाड्यांमधून दरदिवशी हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. अशावेळी रॅम्पवरून फुट ओव्हरब्रिजवर चढण्यासाठी मोठी गर्दी होते. काही प्रवासी लवकर स्थानकाबाहेर पडण्यासाठी रेल्वे नियमांचे उल्लंघन करताना आढळतात.
भविष्यात बालाघाटच्या पुढे रेल्वे मार्गाला देशाच्या उत्तर भागाशी जोडण्याची योजना आहे. अशात अतिरिक्त भार या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिला जाणार आहे. असे झाले तर सदर फूट ओव्हरब्रिज आवश्यकतेपेक्षा अधिक प्रवाशांचा भार सहन करू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशास्थितीत या अरूंद रॅम्पच्या जागेवर नवीन तथा रूंद रॅम्पची गरज आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरसुद्धा सध्या एका नवीन फूट ओव्हरब्रिजचे काम करण्यात आले आहे. हे फूट ओव्हरब्रिजसुद्धा अत्यंत अरूंद अरून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परंतु रेल्वे प्रशासन नवीन अरूंद पूल तयार करण्यातच गुंतले आहे.
एस्कलेटर बनेल तर रॅप्म हटेल
प्लॅटफॉर्म क्रमांक ५ व ६ वरील रॅम्प अत्यंत अरूंद आहे. परंतु गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सर्वच फलाटांवर एस्कलेटर मंजूर करण्यात आले आहेत. भविष्यात सर्वच फलाटांवर एस्कलेटर लागल्यावर रॅम्पची गरज पडणार नाही, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले आहे.