डॉ. बाबासाहेबांनी दिलेले संविधान न्याय देण्यासाठी

By Admin | Updated: December 26, 2015 02:00 IST2015-12-26T02:00:10+5:302015-12-26T02:00:10+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या मानसापर्यंत न्याय मिळावा यासाठी संविधान देशाला दिले.

Dr. To give justice to the constitution given by Babasaheb | डॉ. बाबासाहेबांनी दिलेले संविधान न्याय देण्यासाठी

डॉ. बाबासाहेबांनी दिलेले संविधान न्याय देण्यासाठी

साकोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या मानसापर्यंत न्याय मिळावा यासाठी संविधान देशाला दिले. मात्र बहुरूपी समाज आजही दारिद्रयात जीवन जगत आहे. या बहुरूपी समाजातील लोकांच्या समस्या नक्कीच मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देवून त्यांनाही स्वाभीमानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करू, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चारगाव येथे विदर्भस्तरीय बहुरूपी समाजाच्या भव्य मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी मंचावर खा. नाना पटोले, आ. बाळा काशिवार, विदर्भ बहुरूपी समाज संघटनेचे अध्यक्ष ताराचंद माहुरे, उपसभापती लखन बर्वे, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, सामाजिक कार्यकर्ता बंडू बोरकर, पं.स. सदस्य जयश्री पर्वते, दमयंती राऊत, माजी उपसभापती श्रावण बोरकर, सरपंच रिता उईके, उपरपंच सुरेश लंजे, घनशाम सुतार, पोलीस पाटील गोपीनाथ लंजे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहुरूपी समाजातील गुणवंत विद्याथर्भ, कलावंत यांचा स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून हिवराज लंजे यांनी बहुरूपी समाजातील जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, नोकरीत विशेष प्राधान्य देण्यात यावे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वसाहत बांधून देण्यात यावे, शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन शेखर माहुले यांनी तर आभार प्रदर्शन वासूदेव सुतार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता भक्तप्रल्हाद माहोेरे, संजय सुतार, ओमप्रकाश तांदुळकर, मोहन सुतार, प्रभू माहुले, रामक्रांत माहुले, लक्ष्मण सुतार, भैयालाल सुतार, दिगांबर सुतार, मनोहर तांदुळकर, राजु तांदुळकर व चारगाव वासीयांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dr. To give justice to the constitution given by Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.