डॉट्स उपचार पद्धती क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:22 IST2018-03-30T22:22:28+5:302018-03-30T22:22:28+5:30
क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रसित होतात. क्षयरूग्णांना बरे होण्यासाठी डॉट्स उपचार पध्दती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे, ....

डॉट्स उपचार पद्धती क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रसित होतात. क्षयरूग्णांना बरे होण्यासाठी डॉट्स उपचार पध्दती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन जि.प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण सोसायटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्या संयुक्त वतीने जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल परियाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल काळे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. चांदेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस. भुमकर उपस्थित होते.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच क्षयरोगाबाबत जनजागृती करणारे पत्रकांचे वाटप करण्यात आले. या वेळी क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा जिल्हा क्षयरोग केंद्र गोंदिया येथील सर्व कर्मचारी तसेच दृष्टी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन चौधरी, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचे कर्मचारी, नर्सिंग विद्यालयाचे प्रशिक्षणार्थी, राधाबाई नर्सिंग विद्यालयाचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सभागृह, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. उदघाटन जि.प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल काळे, सी.बी. भुजाडे, प्रज्ञा कांबळे, धनेंद्र कटरे, हरिश चिंधालोरे, अमित मंडल, डी.सी. डोंगरवार, पंकज लुथडे, गजभिये, अग्रवाल, विलास राठोड, एच.एस. उईके, ज्योती आगाशे, प्रियंका पटले, सुभाष कापडणे, खरेद, राजू मेश्राम, रिजवाना शेख, संजय रेवतकर, रामचंद्र लिल्हारे, मंजुश्री मेश्राम यांनी सहकार्य केले. संचालन वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पवन वासनिक यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.बी.एस. भुमकर यांनी मानले.