रेल्वेत प्रवास नको रे बाबा, दररोज ८० ते ९० तिकिटे होतात रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:37+5:302021-04-22T04:30:37+5:30
.............. मुंबई, दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांमधील गर्दी ओसरली -हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे प्रमुख रेल्वेस्थानक आहे. सद्य:स्थितीत या रेल्वेस्थानकावरून आठवड्यात ...

रेल्वेत प्रवास नको रे बाबा, दररोज ८० ते ९० तिकिटे होतात रद्द
..............
मुंबई, दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांमधील गर्दी ओसरली
-हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे प्रमुख रेल्वेस्थानक आहे. सद्य:स्थितीत या रेल्वेस्थानकावरून आठवड्यात ४० रेल्वेगाड्या धावत आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मुंबई, दिल्ली जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी बरीच कमी झाली आहे.
- गोंदिया रेल्वेस्थानकावरून मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे; पण मागील पंधरा दिवसांपासून प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, रेल्वेस्थानकावर शुकशुकाट दिसून येत आहे.
- गोंदिया रेल्वेस्थानकावरील तिकीट आरक्षण केंद्रावरून सध्या मुंबई आणि दिल्लीला जाण्यासाठी बुकिंग केलेले सर्वाधिक तिकिटे रद्द केली जात आहेत.
.................
कोट
मागील दोन-तीन महिन्यांपासून परिस्थिती पूर्वपदावर आल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यात आली होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गाड्यांची संख्या कमी करण्यात आली असून, काही विशेष रेल्वे गाड्या सुरू आहेत.
- जनसंपर्क अधिकारी रेल्वे.
.............
दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या : १५००
दररोज जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या : १०
आरक्षण रद्द करणाऱ्यांची संख्या : ८०-९०
..........
जबलपूर-चांदाफोर्ट विशेष गाडीत गर्दी कमी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची गर्दी कमी झाल्याने गाड्या रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे. जबलपूर-चांदाफोर्ट या विशेष गाडीतील गर्दी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.