दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST2021-05-07T04:30:51+5:302021-05-07T04:30:51+5:30

गोंदिया : लस घेण्याचा एक टाइम फ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या डोसला उशीर ...

Don't panic if the second dose is delayed | दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका

गोंदिया : लस घेण्याचा एक टाइम फ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका, अशी बाब वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून सोयीनुसार घाई न करता लसीकरण करून घ्यावे.

जिल्ह्यात आतापर्यंत १६८८८९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी १३९७३६ जणांना पहिला डोस, तर २९१५३ जणांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

डोस देण्यात आलेल्यांमध्ये आरोग्यसेवक १८,५९४, फ्रंटलाइन वर्कर १५,७९७, तसेच १८ ते ४४ व ४५ वयोगटांवरील व्यक्ती व वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा जाणवत असल्याची चर्चा व तशी स्थितीही दिसून येत असल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणे कठीण जाणार काय, असे वाटत आहे. दुसऱ्या डोससाठी उशीर झाला, तर घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, असेच तज्ज्ञ व्यक्ती सांगत आहेत. कोरोना महामारी थांबविण्यासाठी व्हॅक्सिन एक मोठे शस्त्र म्हणून समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊन येणाऱ्या लाटेसाठीही आपण सज्ज होऊ शकतो, किंबहुना पहिल्याच लसीकरणांतर्गत अजूनही बहुतांश नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही. उल्लेखनीय म्हणजे गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ६८२३४ वरिष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे.

............

‘हर्ड इम्युनिटी’ सार्वजनिक होईल

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एखाद्या व्यक्तीने पहिला डोस घेतला असेल व त्यानंतर ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. कोरोनामुक्त बरा झाल्यावर किमान सहा आठवड्यांनंतर लसीकरणाचा दुसरा डोस घेता येतो. याशिवाय, नॉर्मल व्यक्तीला दुसरा डोस घेण्यासाठी उशीर झाला असेल, तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एक किंवा दोन आठवडे उशीर झाला, तर शरीरात कुठलाही बदल होत नाही. पहिल्या लसीकरणानंतर निर्माण झालेल्या ॲण्टिबॉडीज आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात, किंबहुना येणाऱ्या दिवसांत ‘हर्ड इम्युनिटी’ प्रकार सार्वजनिक झालेला असेल.

-डॉ. विकास जैन, अध्यक्ष, आयएमए, गोंदिया

.............

एक नजर लसीकरणावर

आरोग्यसेवक : १८५९४

फ्रंटलाइन वर्कर ज्येष्ठ नागरिक : १५७९७

ज्येष्ठ नागरिकांनी : ६८२३४

४५ वयांपेक्षा जास्त : १६६७७

.......

Web Title: Don't panic if the second dose is delayed