दानदात्यांच्या वारसांना मतदार यादीतून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:02 AM2019-02-13T01:02:04+5:302019-02-13T01:04:33+5:30

जमीन दान देणाऱ्या पूर्वजांच्या ५७ वारसदारांना ग्रामदान मंडळाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार ग्राम नवेझरी येथे उघडकीस आला आहे. तिरोडा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने काही जणांनी केलेल्या अर्जावरुन यादीतून नावे वगळल्याची माहिती आहे.

The donors' heirs are excluded from the voters list | दानदात्यांच्या वारसांना मतदार यादीतून वगळले

दानदात्यांच्या वारसांना मतदार यादीतून वगळले

Next
ठळक मुद्देतहसील कार्यालयाचा कारभार : चौकशी करून यादीत नावे समाविष्ट करा

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : जमीन दान देणाऱ्या पूर्वजांच्या ५७ वारसदारांना ग्रामदान मंडळाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार ग्राम नवेझरी येथे उघडकीस आला आहे. तिरोडा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने काही जणांनी केलेल्या अर्जावरुन यादीतून नावे वगळल्याची माहिती आहे. यामुळे वारसांनामध्ये तीव्र असंतोष व्याप्त असून याची चौकशी करुन नावे समाविष्ठ करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ अन्वये नवेझरी येथे ग्राम मंडळाची स्थापना करण्यात आली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतून गावाला प्रेरणा मिळाली. विठोबा भांडारकर, रामाजी भांडारकर, मोरेश्वर हरडे, मोरबा हरडे, गंगाराम हरडे यांनी जमीन दान दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी भूमिहीनांना जमिनी दिल्या. मुल्याच्या २० वा अंशदान पैश्याच्या स्वरुपात दान ग्राम मंडळाला दिले. ग्रामदान मंडळाच्या सदस्य नोंदणी पुस्तकात असलेली नावे ही ग्राममंडळाच्या स्थापनेच्या वेळी जमीन दान दिलेल्या किंवा अंशदान दिलेल्या व्यक्तीची व त्यांच्या वारसाची आहेत. ग्रामदान अधिनियमान्वये बाहेगावी कार्यानिर्मिती वारसदार असणाºया व्यक्तींना सुध्दा ग्राम मंडळाच्या सभेत येण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
तसेच मतदानाचा अधिकार सुध्दा दिला आहे. परंतु काही व्यक्तीची नावे वगळण्याकरीता खोटी तक्रार तहसीलदारांना दिली. या अर्जावर तहसीलदाराने १५ जानेवारीला आपेक्ष व दावे सादर करण्याकरीता वारसदारांना पत्र पाठविले. हे पत्र तलाठ्याकडून वारसदारांना १६ जानेवारीला मिळाले. पत्रानुसार १७ जानेवारी ही हरकती व दावे सादर करण्याची अंतीम मुदत होती. परंतु अल्प कालावधीत बाहेर असलेल्या व्यक्तींना येणे शक्य झाले नाही. त्यामुळे ग्राममंडळ सदस्यांचा नोंदणी पुस्तकात ५७ सदस्यांची नावे वगळण्यात आली आहेत. परिणामी त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.
या प्रकरणाची अर्जदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन यादीत नावे समाविष्ट करण्यात यावे. अशी मागणी क्रिष्णा भांडारकर, लता भांडारकर, शिवशंकर मेश्राम, रतन मेश्राम, ओमराज मेश्राम यांच्यासह ५४ सदस्य वारसदारांनी केली आहे. याप्रकरणी वारसदारांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केल्याची माहिती आहे.

निवडणुकीपूर्वी नावे समाविष्ट करा, अन्यथा तीव्र आंदोलन
ग्रामदान अधिनियमातंर्गत बाहेरगावी कामानिमित्त असणाऱ्या दानदात्यांच्या वारसांना ग्राम मंडळाच्या सभेत येण्याचा व ग्राम मंडळाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. परंतु यादीतून नावे वगळण्यात आल्याने त्यांना निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

Web Title: The donors' heirs are excluded from the voters list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.