अनुदान थांबवू नका-पटेल
By Admin | Updated: March 20, 2015 00:57 IST2015-03-20T00:57:23+5:302015-03-20T00:57:23+5:30
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ, ...

अनुदान थांबवू नका-पटेल
गोंदिया : महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ, संत बांगळुबाबा शैक्षणिक सुधारणा मंडळ यांच्या संयुक्त विद्ममाने जिल्हा पर्यटन महोत्सव कोसमतोंडी (नागझिरा) येथे पार पडला. मात्र म्हसवाणी येथील पवन शिक्षण संस्थेत महोत्सव झाल्याचे दाखवून त्याचा अनुदान निधी थांबविण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी अमित सैनी करीत असल्याचा आरोप राजू पटेल मलनस यांनी केला आहे.
कोसमतोंडी येथील महोत्सव तत्कालिन आमदार व सध्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व आयोजक संस्थांव्दारे पार पडले होते. महोत्सवात नेते डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. हेमंत पटले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे व माजी आ. रामरतनबापू राऊत, तुरकर, राजेश चतुर, पोलीस अधिकारी, तत्कालिन जिल्हा कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे, अविनाश काशिवार व जिल्ह्यातील हजारो कलावंत साहित्यीक व वरिष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत पार पडले होते.
सदर महोत्सवाचा खर्च आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ व संत बांगळुबाबा शैक्षणिक सुधारणा मंडळाने केला. याकरिता निधी मंजूर करण्यात आले व जिल्हाधिकारी गोंदिया यांना निधी संस्थेला वितरित करण्याचे आदेश दिले. संस्थेने कर्जाऊ रक्कम घेऊन महोत्सवावर खर्च केला. मात्र महोत्सव निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरित न झाल्यामुळे आयोजकांवर संकट ओढवले आहे. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विनंती केली आहे. अधिवेशन काळात तत्कालिन महोत्सवाचे अध्यक्ष आताचे सामाजिक न्यायमंत्री बडोले व खा. नाना पटोले यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांना फोन करून संस्थेला निधी वितरित करण्यासंबधी कळविले आहे. परंतु पवन शिक्षण संस्थेच्या मागणीनुसार म्हसवाणी येथे महोत्सव झाल्याचे जिल्हाधिकारी सैनी दाखवित असल्याचा आरोप राजू पटेल यांनी केला आहे. त्यामुळे कोसमतोंडी (नागझिरा) येथे झालेल्या महोत्सवाची शहानिशा करावी, पोलीस, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत चौकशी करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही संस्थांना आमोरासमोर बोलवून निधी वाटप करावा अन्यथा शासनाचा अनुदान रोखून पर्यटन योजनेला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पर्यटनभूषण राजू पटेल मलनस यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)