विनापरवाना वाहन चालवू नका
By Admin | Updated: September 5, 2015 02:25 IST2015-09-05T02:25:29+5:302015-09-05T02:25:29+5:30
विनापरवाना वाहन चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना वाहन चालविणारा व्यक्ती हा अपघातास कारणीभूत राहतो.

विनापरवाना वाहन चालवू नका
पी.बी. भोसले : खमारी येथे कायदेविषयक शिबिर
गोंदिया : विनापरवाना वाहन चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना वाहन चालविणारा व्यक्ती हा अपघातास कारणीभूत राहतो. त्यामुळे प्रत्येकाने परवाना काढून वाहन चालवावे, असे मत न्यायमूर्ती पी.बी. भोसले यांनी व्यक्त केले.
जवळील ग्राम खमारी येथील श्रीराम विद्यालय व आर.एस.डोये कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने गुरूवारी आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी न्या.पी. एच. खरवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील बिना बाजपेई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.टी.बी. कटरे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी, पालकांनी आपल्या पाल्यांचा विचार करुन १८ वर्ष पूर्ण झाल्यावर परवाना काढून वाहन चालविण्यास द्यावे. अपघातामुळे होणारे दुष्परिणाम पाल्यांच्या लक्षात आणून द्यावे. त्यामुळे पाल्य सुद्धा जबाबदारीने वाहन चालवतील. रॅगिंगचे दुष्परिणाम पटवून देऊन मुलांनी व्यसनापासून दूर रहावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना न्या. खरवडे यांनी, १८ वर्षाखालील बालकांना मोफत विधी सहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुकास्तरावर तालुका विधी सेवा समित्यांकडे मदत मागावी असे सांगितले.अॅड. बाजपेई यांनी बेटी बचाओ, बेटी बढाओ, अॅड.कटरे यांनी शिक्षणाचा अधिकार, पोलीस अधिकारी न्यायदे यांनी बालकांसाठी विशेष बाल पोलीस पथक याबाबतची माहिती दिली. या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाला इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये अनेक विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालन अॅड. धोटे यांनी केले. आभार प्राचार्य मार्कंडेय यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे के.टी. कढव, एम.पी. पटले, के.एस. पिल्लेवान, शिवदास थोरात, विद्यालयाचे पर्यवेक्षक बी.जे. रावते, यु.आय. चौधरी, आर.एस. डोये यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)