धनगरांना अनुसूचित जमातीत स्थान देऊ नका
By Admin | Updated: September 6, 2014 23:56 IST2014-09-06T23:56:23+5:302014-09-06T23:56:23+5:30
तालुका आदिवासी बचाव कृती समितीद्वारे शनिवारी (दि.६) धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात येऊ नये याकरिता निवेदन तयार करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे

धनगरांना अनुसूचित जमातीत स्थान देऊ नका
गोरेगाव : तालुका आदिवासी बचाव कृती समितीद्वारे शनिवारी (दि.६) धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात येऊ नये याकरिता निवेदन तयार करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे तहसीलदारांंना देण्यात आले. ज्यात प्रामुख्याने बोगस आदिवासींचा धुडगूस अनुसूचित जमातीमध्ये करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीला घेऊन निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळाचे नेतृत्व आदिवासी हलबा/हलबी समाज संघटनेचे उपाध्यक्ष जे.टी. दिहारे, अजय कोठेवार, आदिवासी पिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रेमचंद गेडाम, तिलक मडावी यांनी केले. याप्रसंगी रामचंद्र फरदे, सुकलाल दिहारे, साधु पुंगळे, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष निलाराम नाईक, आदिवासी एम्पलाईज फेडरेशनचे अध्यक्ष चैतराम कोयलारे, मोठू बिसेन, एच.बी. राऊत, टि.जी. कोडापेसर, शिवानंद फरदे, चंदनसिंग मडावी, शंकर काठवार, बी.एच. वळगाये, सुरज कोयलारे, शंकर राऊत, विरेंद्र चाकाटे, खेमराज भंडारी, आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष स्नेहील कोठेवार, सुभाष चुलपार, मोतीलाल लटये, यशवंत मेळे, मोरेश्वर येल्ले, संजय धानगाये, प्रदीप काठेवार, हरिराम टेकाम, घनशाम राऊत, मुकेश मरस्कोल्हे, कृष्णा परतेकी, सावलराम ताराम, राजकुमार उईके आदी समाजबांधव उपस्थित होते.
तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आदिवासी बांधवांची सभा स्थानिक आदिलोक भवनात जे.टी. दिहारे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली.
सभेत टी.जे. कोडापे, बी.एच. वळगाये, मोठू बिसेन, चैतराम कोयलारे, अजय कोठेवार यांनी संबोधित केले. गणेश चुलपार, रामचंद्र लटये, ग्यानीराम लटये, सोहन भंडारी, उत्तम गावराणे, उमेंद्र उईके, रतिराम घरते, गोवर्धन किरसान आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सभेचे संचालन निलाराम नाईक यांनी केले. तर आभार शिवानंद फरदे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)