नुकसानीचे पंचनामे तीन दिवसात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:15+5:30
शासनाच्या आदेशानुसार सर्वच महसूल मंडळातील ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय अचूकपणे पंचनामे करु न संबंधीत अधिकारी व कर्मचाºयाचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्र मांक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

नुकसानीचे पंचनामे तीन दिवसात करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी शनिवारी (दि.३) गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्याचा दौरा करुन नुकसानीचा आढावा घेतला. तसेच तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
शासनाच्या आदेशानुसार सर्वच महसूल मंडळातील ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय अचूकपणे पंचनामे करु न संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्र मांक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच उपस्थित विमा कंपनीच्या प्रतिनीधींना पीक-विमा काढलेल्या व पीक-विम्याकरीता अर्ज केलेल्या शेतकºयांचे पिकांच्या नुकसानीचे दावे लवकरात लवकर काढण्याचे सांगितले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेन्द्र पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नयनवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखडे, तहसीलदार शेखर पुनसे,विनोद मेश्राम संबंधित तालुका कृषी अधिकारी, तलाठी, कृषीसेवक सरपंच व सदस्य तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तिन्ही विभागाच्या यंत्रणेने आतापर्यंत केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा जिल्हाधिकाºयांनी या वेळी घेतला. तसेच पंचनामे करताना शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत हे जाणून घेतले. शेतकºयांशी संवाद साधून शासकीय मदती संबंधीची कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले. पिकांच्या नुकसानीची कार्यवाही सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तालुकानिहाय उपजिल्हाधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले.