दानशूर आत्माराम डोंगरवार यांना आदरांजली
By Admin | Updated: July 24, 2015 01:16 IST2015-07-24T01:16:11+5:302015-07-24T01:16:11+5:30
स्थानिक बी.ए.डी.विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दानशूर स्व.आत्माराम सदाशिव डोंगरवार यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी विद्यालयातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

दानशूर आत्माराम डोंगरवार यांना आदरांजली
नवेगावबांध : स्थानिक बी.ए.डी.विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दानशूर स्व.आत्माराम सदाशिव डोंगरवार यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी विद्यालयातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.आर.मेंढे होते.
अतिथी म्हणून पर्यवेक्षक डी.डब्ल्यू. खुणे, प्रा.एन.व्ही. कापगते, प्रा. लांजेवार, कुथे, टी.टी. कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम आत्माराम डोंगरवार यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी त्यांचे नाट्यप्रेम, राजकारण, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य आदी गुणांवर आधारित विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक के.ए. रंगारी यांनी, संचालन आर.टी. काशिवार व आभार पर्वते यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)