दिवाळी सरली, जनजीवन पूर्वपदावर
By Admin | Updated: October 27, 2014 22:38 IST2014-10-27T22:38:15+5:302014-10-27T22:38:15+5:30
दिवाळीच्या सुट्या सरल्या असून कामाकाजाला पुन्हा सुरूवात झाली आहे. शहरातील काही शाळांचा ठोकाही वाजला असून विद्यार्थी शाळेत जाताना दिसून येत आहे. तर ओस पडलेल्या कार्यालयांत पुन्हा

दिवाळी सरली, जनजीवन पूर्वपदावर
गोंदिया : दिवाळीच्या सुट्या सरल्या असून कामाकाजाला पुन्हा सुरूवात झाली आहे. शहरातील काही शाळांचा ठोकाही वाजला असून विद्यार्थी शाळेत जाताना दिसून येत आहे. तर ओस पडलेल्या कार्यालयांत पुन्हा गर्दी वाढली आहे. एकंदर दिवळी सरली असून सुट्या संपल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
दिवाळीचा सण असल्याने बाहेरून येणारे अधिकारी व कर्मचारी सुट्या घेऊन दिवाळी पूर्वीच आपापल्या घरी निघून गेले होते. तर लक्ष्मीपूजनापासून सलग सुट्या असल्याने कार्यालयेही बंदच होती. शिवाय शाळा व महाविद्यालयांच्या सुट्या असल्याने विद्यार्थ्यांची नेहमीची वर्दळ दिसेनाशी झाली होती. सुट्यांमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.
आता मात्र दिवाळीच्या सुट्या संपल्याअसून सोमवारपासून (दि.२७) कार्यालये ही पुन्हा उघडले आहेत. अधिकारी व कर्मचारी दिवाळीच्या सुट्या आटोपून आपापल्या कामावर पुन्हा रूजू झाले आहेत. आता आपली कामे ही होणार हे जाणून नागरिकांनी कार्यालयांकडे धाव घेतल्याने कार्यालयांत गर्दी दिसून आली. त्यातल्या त्यात शहरातील काही शाळांचाही ठोका वाजल्याने विद्यार्थीही गणवेश परिधान करून शाळेत जाताना नजरेत पडले.
येथील कित्येक कार्यालयांत कार्यरत अधिकार/कर्मचारी बाहेरगावाहून रेल्वेने अपडाऊन करतात. रविवारपर्यंत (दि.२६) आलेल्या सलग सुट्यांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आवागमन बंद होते. त्यामुळेही शहरात गर्दी दिसून येत नव्हती. मात्र सोमवारपासून (दि.२७) त्यांचेही आवागमन सुरू झाल्याने विदर्भ, छत्तीसगड, अहमदाबाद सारख्या गाड्यांच्या वेळेवर पुन्हा गर्दी दिसून येत आहे. यातून दररोजच्या सामान्य जीवनाची गाडी पुन्हा पटरीवर आल्याचे बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)